राजापुरातील तरुणाचा आकस्मिक मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापुरातील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
राजापुरातील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

राजापुरातील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

sakal_logo
By

rat13p46.jpg
21744
ः अक्षय गुरव
-------------
राजापुरातील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
राजापूर, ता. १४ ः शहरातील तालीमखाना गुरववाडी येथील तरुण अक्षय अशोक गुरव (वय २८) याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अलिबाग ते राजापूर प्रवासादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. अक्षय अलिबाग येथील शासकीय सेवेत होता. गुरुवारी रात्री तो अलिबाग येथून वडखळ येथे आला व तेथून आपल्या मित्राच्या टेम्पोतून राजापूरकडे येत होता. खेड ते चिपळूणदरम्यान आले असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या दोन्ही मित्रांनी त्याला उपचारासाठी कामथे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचे निधन झाले. त्याच्या मागे आई, भाऊ, बहिण असा परिवार आहे. त्याच्यावर रात्री उशिरा शहरातील गुरववाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
---------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58096 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top