मोरे-वाडोसमध्ये मंगळवारी ‘अस्थिव्यंग’ नोंदणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोरे-वाडोसमध्ये मंगळवारी ‘अस्थिव्यंग’ नोंदणी शिबिर
मोरे-वाडोसमध्ये मंगळवारी ‘अस्थिव्यंग’ नोंदणी शिबिर

मोरे-वाडोसमध्ये मंगळवारी ‘अस्थिव्यंग’ नोंदणी शिबिर

sakal_logo
By

मोरे-वाडोसमध्ये मंगळवारी
‘अस्थिव्यंग’ नोंदणी शिबिर
कुडाळ, ता. १४ ः जिल्ह्यातील खेडोपाड्यात असलेल्या अस्थिव्यंग बालकांना उत्तम दर्जाचे शिक्षण, वैद्यकीय सुविधा, सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी ‘हेल्पर्स ऑफ दी हॅण्डिकॅप्ड’ व ‘हॅण्डिहेल्प वेल्फेअर फाउंडेशन’च्या संयुक्त विद्यमाने ‘अस्थिव्यंग’ दिव्यांग शालेय विद्यार्थी नोंदणी शिबिर आयोजित केले आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळी नऊ ते सायंकाळी ४ दरम्यान स्वप्ननगरी, अपंग सहाय्यता केंद्र, मोरे-वाडोस येथे हे शिबिर होणार आहे.
निवड झालेल्या अस्थिव्यंग मुला-मुलींना कोल्हापुरात वैद्यकीय सेवा, कृत्रिम साधने, शिक्षण व वसतिगृह प्रवेश देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. जास्तीत जास्त अस्थिव्यंग बालकांनी या शिबिरास उपस्थित राहून सर्वांगीण पुनर्वसनाच्या या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दोन्ही संस्थांच्यावतीने केले आहे. या शिबिरात अस्थिव्यंग बालकांची वैद्यकीय तपासणी करून मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स उपस्थित असणार आहेत. शिबिराचे उद्‍घाटन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होईल. तसेच आयआरएस जॉईंट कमिशनर, सेन्ट्रल जीएसटी, कोल्हापूरचे श्री. सबरीश, श्याम चव्हाण, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्याम चव्हाण, सरपंच संजना म्हाडगुत आदींची प्रमुख उपस्थिती असेल. शिबिरासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स, बेळगावी तसेच रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांचे विशेष सहकार्य व प्रत्यक्ष सहभाग लाभणार आहे, असे पत्रकात संचालक उदय गोखले यांनी म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58099 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top