
जीवनगौरव पुरस्काराने होणार प्रा. चंद्रकांत देशपांडे यांचा सन्मान प्रा. चंद्रकांत देशपांडे यांचा सन्मान
-rat14p2.jpg
21730
चंद्रकांत देशपांडे
----------------
जीवनगौरव पुरस्काराने होणार
प्रा. चंद्रकांत देशपांडे यांचा सन्मान
राजापूर, ता. १४ ः शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रासह स्वःकर्तृत्वाने राजापूरसह जिल्ह्यामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारे शिक्षणमहर्षी प्रा. चंद्रकांत उर्फ चंदूभाई देशपांडे यांचा जीवनगौरव सोहळा मंगळवारी (ता. १७) आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्यामध्ये देशपांडे यांच्या चतुरस्त्र कार्याचा सन्मान म्हणून त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. येळवण येथील शाळेमध्ये सकाळी १०. ३० वा. होणाऱ्या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार हुस्नबानू खलिफे आदी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन गौरव सोहळ्याच्या नियोजन समितीचे अध्यक्ष विश्वनाथ लाड, उपाध्यक्ष दशरथ जाधव, कार्याध्यक्ष मोहन सकपाळ, सरचिटणीस सुधीर शिर्के, अनंत साळवी यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58102 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..