
कॅम्पच्या तालुकानिहाय तारखा जाहीर कराव्यात
21750
सुरेश भोगटे
कॅम्पच्या तालुकानिहाय
तारखा जाहीर कराव्यात
सुरेश भोगटे ः ‘आरटीओ’ला निवेदन
सावंतवाडी, ता. १४ ः परिवहन खात्याकडून तालुकास्तरावरील आरटीओ कॅम्पच्या तारखा निश्चित केल्या आहेत. यामुळे माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केलेल्या मागणीला यश आले असून, त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच जिल्ह्यातील जनतेच्या माहितीसाठी परिवहन खात्याने तालुकानिहाय कॅम्पच्या तारखा जाहीर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
जिल्ह्यात साधारणत: आठ तालुके असून, तालुक्यांची व्याप्ती मोठी आहे. यामुळे तालुका व शहरवासीयांना दळणवळणाच्या व्यवस्येमुळे गैरसोयी निर्माण होत होत्या. कोरोना काळात आरटीओचे तालुका निहाय बंद होते. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात एसटी सेवा देखील बंद असल्याने लोकांना ओरोस येथे आरटीओच्या काही कामानिमित्त जाणे कठीण बनले होते. तालुका व शहर ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यांतर्गत वाहन धारकांसाठी परवाना, परवाना तपासणी, पासिंग व इतर छोट्या - मोठ्या कामांसाठी तालुकास्तरावर पूर्वीप्रमाणे कॅम्प सुरू करावेत, अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे मार्च महिन्यात केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून, आता तालुकास्तरावरील आरटीओ कॅम्पच्या तारखा निश्चित केल्या आहेत. याबाबत श्री. भोगटे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच निश्चित केलेल्या तारखा लोकांच्या माहितीसाठी तालुकानिहाय जाहीर करण्यात याव्यात. त्यामुळे वाहन धारकांना याची माहिती प्राप्त होईल, अशी मागणीही त्यांनी केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58105 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..