कबड्डी स्पर्धेत आमदार निकम यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबड्डी स्पर्धेत आमदार निकम यांचा गौरव
कबड्डी स्पर्धेत आमदार निकम यांचा गौरव

कबड्डी स्पर्धेत आमदार निकम यांचा गौरव

sakal_logo
By

-ratchl141.jpg
21738
चिपळूण ः आमदार शेखर निकम यांचा गौरव करताना साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के.
----------
कबड्डी स्पर्धेत आमदार निकम यांचा गौरव

कालभैरव कोयनानगर ठरला विजेता; महाकाली कुंभार्ली द्दितीय
चिपळूण, ता. १४ ः तालुक्यातील वेहेळे भोजनेवाडी येथील राधाकृष्ण मंदिराच्या भव्य महोत्सवानिमित्त आयोजित मॅटवरील कबड्डी स्पर्धेत कालभैरव कोयनानगर विजेता ठरला. या निमित्ताने सातारा नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी आमदार शेखर निकम यांचा कंदीपेढ्यांचा हार घालून भव्य सत्कार केला.
वेहेळे भोजनेवाडी येथे राधाकृष्ण मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या वेळी कीर्तन, हरिजागर असे कार्यक्रम उत्साहीपूर्ण वातावरणात पार पडले. याचबरोबर मॅटवरील कबड्डी स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेत कालभैरव कोयनानगर हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. महाकाली कुंभार्ली संघ द्वितीय, सिद्धिविनायक कळकवणे तृतीय तर सिद्धार्थ धामणे संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. या संघांना आमदार शेखर निकम व सुहास राजेशिर्के यांच्यासह वेहेळे भोजनेवाडी ग्रामस्थांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी माजी उपसभापती सूर्यकांत खेतले, नितीन ठसाळे, दशरथ दाभोळकर, प्रकाश भोजने, दिलीप भोजने, दिलीप राजेशिर्के, उदय भोजने, गोविंद मिरगल, महेश वाजे, राम राजेशिर्के, बंड्या राजेशिर्के आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58123 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top