
डिंगणेत कबड्डी स्पर्धेचा थरार
21754
डिंगणे ः येथे शिवभवानी सावंतवाडी संघाला विजेतेपदाचा चषक प्रदान करताना दयानंद कुबल. शेजारी इतर. (छायाचित्र - निलेश मोरजकर)
डिंगणेत कबड्डी स्पर्धेचा थरार
उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘एस एम सिंधु स्पोर्ट्स’, ‘शिवभवानी विजेते’
बांदा, ता. १३ ः डिंगणे येथे एमजीएम ग्रुप व डिंगणे ग्रामस्थांच्यावतीने आयोजित ‘माऊली चषक २०२२’ या महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद अनुक्रमे एस एम सिंधु स्पोर्ट्स, कुडाळ व शिवभवानी सावंतवाडी या संघांनी मिळविले. माऊली मंदिर मैदानात २ दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित संघांमधील थरार यावेळी क्रीडा रसिकांनी अनुभवला.
निकाल अनुक्रमे असा ः महिला कबड्डी स्पर्धा- एस. एम. सिंधु स्पोर्ट्स, कुडाळ, जय गणेश, मालवण. अष्टपैलू महिला खेळाडू- काजल नार्वेकर (एस.एम.सिंधु स्पोर्ट्स). उत्कृष्ठ चढाई- जे. पी. लक्ष्मी (जय गणेश,मालवण). उत्कृष्ठ पकड- नूतन बगळे (एस.एम.सिंधु स्पोर्टस). शिस्तबद्ध संघ- पाट हायस्कूल, कुडाळ. अंतिम सामना सामनावीर- कोमल रंणसिंग (एस. एम. सिंधु स्पोर्ट्स). पुरुष कबड्डी स्पर्धा-शिवभवानी सावंतवाडी, रेवतळे मालवण, जय महाराष्ट्र, सावंतवाडी, गुढीपुर पिंगुळी. अष्टपैलू खेळाडू- ललित चव्हाण (रेवतळे मालवण), उत्कृष्ठ चढाई- वेदांग हरमळकर (शिवभवानी सावंतवाडी), उत्कृष्ठ पकड- विकी रेडिज (शिवभवानी सावंतवाडी), स्टायलिश प्लेअर- संकेत जाधव (रेवतळे मालवण), शिस्तबद्ध संघ- विराज स्पोर्ट्स कणकवली.
पहिल्या दिवशी महिला कबड्डी स्पर्धेचे उदघाटन माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती प्रमोद कामत, माजी सभापती निकिता सावंत, पोलिस कर्मचारी बबिता सावंत, माजी सरपंच स्मिता नाईक, पंच सदस्य गीता सावंत, शालन सावंत, आदेश सावंत आदी उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी पुरुष कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजप बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, बांदा सरपंच अक्रम खान, जिल्हा कबड्डी फेडरेशन कार्यवाहक दिनेश चव्हाण, तांबोळी सरपंच अभिलाष देसाई, डिंगणे उपसरपंच जयेश सावंत आदी उपस्थित होते. कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले. यावेळी माजी उपसभापती शीतल राऊळ, बांदा माजी सरपंच मंदार कल्याणकर, राजाराम सावंत, दत्ताराम शेटकर, लक्ष्मण नाईक, राजन सावंत, एकनाथ सावंत आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58127 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..