सहकारात सहकार्य महत्त्वाचे ः डॉ. सावंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकारात सहकार्य महत्त्वाचे ः डॉ. सावंत
सहकारात सहकार्य महत्त्वाचे ः डॉ. सावंत

सहकारात सहकार्य महत्त्वाचे ः डॉ. सावंत

sakal_logo
By

21768
सिंधुदुर्गनगरी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सत्कार करताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अतुल काळसेकर आदी.


सहकारात सहकार्य महत्त्वाचे

डॉ. प्रमोद सावंत : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे काम कौतुकास्पद

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १४ ः केंद्राच्या योजना राबवत सर्वसामान्यांना तसेच शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचे सिंधुदुर्ग जिल्हा बँक करीत असलेले काम खरोखरच कौतुकाला पात्र आहे. सहकारात काम करताना स्वाहाकार बाजूला ठेवून सहकार्याने काम करणे महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे या बँकेने करून दाखविले आहे. अशा शब्दांत गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जिल्हा बँकेच्या कामकाजाबाबत गौरवोद्‌गार काढले.
मालवण येथे कोकणी साहित्य संमेलनाला आलेले गोवा राज्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी शनिवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी शाल, श्रीफळ व गोमेचा गणपतीमूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला.
सावंत म्हणाले, ‘श्री. दळवी आणि श्री. काळसेकर यांनी नुकतीच आपली गोवा येथे भेट घेतली होती. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला भेट देण्याची विनंती केली. त्यानुसार मी आज येथे आलो आहे. जिल्हा बँकेचा कामकाज अहवाल पाहिल्यावर मला नुसते समाधान नव्हे, तर आश्चर्यही वाटले. कारण, या बँकेने एनपीए झीरोवर ठेवला आहे. खरोखरच ही गोष्ट कौतुकास्पद आहे. आतापर्यंतच्या सर्व संचालक मंडळाने बँकेचे काम मनापासून केल्याने हे शक्य झाले. छोट्या उद्योजक शेतकऱ्यांना महत्त्व देत व्यावसायिक बनविले. केंद्राच्या योजना राबवून आत्मनिर्भर बनवण्याचे काम केले. वास्तविक, राज्याने हा प्रयत्न केला पाहिजे होता; मात्र जिल्हा बँक हा प्रयत्न करतेय, हे बघून आनंद वाटला. या बँकेने नॅशनल बँकेच्या बरोबरीने चांगला व्यवसाय केल्याचे दाखवून दिले. शेती (कृषी) मध्ये काम करून शेतकऱ्यांना मदत करत आहे. असेच उल्लेखनीय कार्य याहीपुढे त्यांच्या हातून घडत जावे. कर्मचारी वर्ग महत्त्वाचा असून, बँकेच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. बँक पुढे न्यायची असेल, तर कर्मचाऱ्यांचे काम महत्त्वाचे आहे.’
दरम्यान, प्रारंभी जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक अनिरुद्ध देसाई यांनी बँकेच्या कामकाजाची माहिती मुख्यमंत्री सावंत यांना दिली.

गोव्याने सहकार्य करावे
जिल्हा बँकेचे अध्यक्ष दळवी म्हणाले, ‘जिल्ह्याची आर्थिक उलाढाल गोव्यावर अवलंबून आहे. या जिल्ह्यातील काही तालुके गोव्याजवळ आहेत. गोव्याचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जवळचे नाते आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक व्यवसाय उभे राहत आहेत. फूड प्रोसेससाठी प्रयत्न आहे. मार्केटच्या दृष्टीने गोव्याकडे बघतो. आता जिल्ह्यातील शेतकरी एक ते दीड हजार दुधाळ जनावरे घेत आहेत. दुग्ध व्यवसायाला चालना देत असून, हे दूध गोव्यामध्ये वितरीत करण्याचा मानस आहे. त्यासाठी गोव्याने सहकार्य करावे.’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58136 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top