गुहागर ः विनयभंगाची तक्रार करुनही अदखलपात्र गुन्हा नोंदवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर ः विनयभंगाची तक्रार करुनही अदखलपात्र गुन्हा नोंदवला
गुहागर ः विनयभंगाची तक्रार करुनही अदखलपात्र गुन्हा नोंदवला

गुहागर ः विनयभंगाची तक्रार करुनही अदखलपात्र गुन्हा नोंदवला

sakal_logo
By

तक्रार विनयभंगाची, नोंदवला अदखलपात्र गुन्हा

संगीता संगमिस्करांची न्‍यायाची मागणी; पोलिस अधीक्षकांचे दुर्लक्ष
गुहागर, ता. १४ ः विनयभंगांची तक्रार असूनही, पोलिस अदखलपात्र गुन्हा म्हणून तक्रार नोंदवून घेतात. जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करूनही फरक पडत नाही. तेव्हा आता न्याय कोणाकडे मागायचा. रोज होणारा अन्याय सहन करायचा का, असा प्रश्न अंजनवेलमधील संगीता नारायण संगमिस्कर यांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना संगमिस्कर म्हणाल्या, आमच्यात आणि एका कुटुंबामध्ये जमिनीवरून वाद आहे. या संदर्भात कोर्टात केस सुरू आहे. ही केस सुरू असतानाही ते सातत्याने आम्हाला त्रास देतात. घरावर दगड टाकायचे. आम्हाला ऐकू येईल, अशा आवाजात मुद्दाम खिजवणारे बोलायचे. आम्ही याकडे दुर्लक्ष करत असू. ११ एप्रिलला या कुटुंबातील २ पुरुष आणि एका महिलेने मला अडकवले. सुरुवातीला महिलेने संपवून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर दोन्ही पुरुषांनी हात पकडले, गळा दाबला, मारले. सुदैवाने हा प्रकार सुरू असताना दीर तिथे आल्याने पुढील गोष्टी टळल्या.
या संदर्भात ११ एप्रिलला आम्ही गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेलो. तेव्हा पोलिस अधिकाऱ्यांनी आमच्या फिर्यादीत या गोष्टीचा उल्लेखच केला नाही. उलट त्यामध्ये जमिनीचा वाद घुसवला. फिर्याद लिहून घेण्यापूर्वीच आरोपीला बोलावले. दोघांची चर्चा झाल्यानंतर कोऱ्या कागदावर आधी अंगठा घेतला. मुलाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यालाच पोलिसी खाक्यात अधिकारी बडबडले. घरी येऊन तक्रारीचा कागद पाहिला, तेव्हा लक्षात आले. पोलिसांनी चॅप्टर केस नोंदवून हा विषय संपवण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून सविस्तर घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा बोलावले. आम्हाला वाटले आता तरी आमची खरी फिर्याद लिहून संबंधितांवर गुन्हे दाखल होतील; परंतु पोलिसांनी अदखलपात्र केस तहसीलदारांकडे सोपवली आहे.
...
आम्ही कोणाकडे दाद मागायची?
आमच्यावर झालेला अन्याय आम्ही ओरडून सांगत आहोत; मात्र पोलिस कायद्याचे संरक्षण देण्यास तयार नाहीत. संबंधित व्यक्तींना यामुळे बळ मिळाले आहे. त्याच्याकडून होणाऱ्या अन्यायाचे प्रकार वाढले आहेत. आता आम्ही कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी व्यथा संगीता संगमिस्कर यांनी सांगितली.
----------------
सदर महिलेने जी तक्रार लिहून दिली, त्याप्रमाणे गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही तक्रार दिल्यानंतर त्या आणखी काही गोष्टी सांगून कारवाईची मागणी करत आहेत. जर गुहागर पोलिस ठाण्यामध्ये त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार करावी. असेही त्यांना सांगण्यात आले आहे.
-बी. के. जाधव, प्रभारी पोलिस निरिक्षक, गुहागर पोलिस ठाणे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58150 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top