संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

-rat14p18.jpg
L21756
ः खेड ः डॉ. पवन अग्रवाल यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना दीप्ती ऑइल ट्रेडर्सचे मिलिंद इवलेकर.
------------
दीप्ती ऑईल ट्रेडर्सला बेस्ट
एडीबल ऑईल ब्रँड पुरस्कार
खेड ः फूड अँड ड्रग कंझ्युमर वेल्फेअर कमिटीच्या कोकण विभागाच्यावतीने देण्यात येणारा बेस्ट एडिबल ऑईल ब्रँड पुरस्कार भरणे येथील दीप्ती ऑइल ट्रेडर्सला नुकताच प्रदान करण्यात आला. मॅनेजमेंटचे डॉ. पवन अग्रवाल यांच्या उपस्थितीत भरणे येथील साई रिसॉर्ट येथे झालेल्या या कार्यक्रमात मिलिंद इवलेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दीप्ती ऑईल ट्रेडर्सच्या माध्यमातून उत्पन्नाचे जाळे सर्वदूर विणताना अनेकांच्या हाताला काम देण्याची किमया इवलेकर यांनी लिलया साधली आहे. शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत.
----------
- rat14p19.jpg
21757
ः खेड ः कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शक सिद्धार्थ राय, सुनील घोरपडे, डॉ. अजित भोसले, संदीप जाधव.
----------
मेकॅनिकल पब्लिकेशन कार्यशाळा
खेड ः तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मेकॅनिकल पब्लिकेशन कार्यशाळा झाली. सिद्धार्थ राय, सुनील घोरपडे यांनी इंग्रजी व गणित विषयासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण व अनुभवातून शिक्षण यावर मार्गदर्शन केले. उद्घाटनप्रसंगी संस्थाध्यक्ष सुरेश पाष्टे, उपाध्यक्ष सुप्रिया पाष्टे, सेक्रेटरी संजना पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, सदस्या स्वाती कान्हेकर, शैक्षणिक समन्वयक डॉ. अजित भोसले उपस्थित होते.
------------
-rat14p20.jpg
21758
ः खेड ः क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी रीलिफ फाउंडेशनचे पदाधिकारी.
------------
रीलिफच्या क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ
खेड ः खेड रीलिफ फाउंडेशन चॅरिटी क्लबच्यावतीने शहरातील गोळीबार मैदानात आयोजित क्रिकेट स्पर्धेत नुकताच प्रारंभ झाला आहे. या फाउंडेशनचे सिकंदर जस्नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेत २४ संघ सहभागी झाले आहेत. उद्घाटनाला फाउंडेशनचे हनिप घनसार, इक्बाल जमादार, हसन हमदुले, जाकिर मुसा, गुलाम चौगुले, रहीम सहीबोले, कोकण स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष मुस्ताक दळवी, साबिर कौचाली आदी उपस्थित होते.
----------
-rat14p21.jpg
L21759
ः खेड ः कोकण महामार्ग देवदूत पुरस्कार स्वीकारताना मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी.
-----------
प्रसाद गांधी यांना देवदूत पुरस्कार
खेड ः महामार्गावर अपघात घडल्यास जखमींना उपचारार्थ दाखल करण्यासाठी धाव घेणाऱ्या मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी यांना कोकण महामार्ग देवदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुहागर येथील श्री सत्यनारायण सन्मित्र सेवा मंडळाच्यावतीने हा कार्यक्रम झाला. संस्थापक अध्यक्ष नारायण साळवी यांच्या हस्ते हा पुरस्कार नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष विलास साळवी, उपाध्यक्ष किशोर साळवी, सचिव प्रमोद साळवी, खजिनदार वसंत साळवी उपस्थित होते.
--------------
-rat14p22.jpg
21760
खेड ः सक्षम- व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण करताना मान्यवर
------------
घरडाच्या प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रमाणपत्र वितरण
खेड ः लोटे औद्योगिक क्षेत्रातील घरडा केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या कौशल्य विकास या सामाजिक उपक्रमांतर्गत दोन महिन्यांपूर्वी असगणी व गुणदे या दोन गावांत सुरू करण्यात आलेल्या सक्षम-व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम झाला. हे सक्षम व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून घरडा कंपनीमार्फत ८० महिलांना मोफत शिवणकाम प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाच्या सुरवातीला सर्व प्रशिक्षणार्थीना शिवणकाम प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्याचे कीट देण्यात आले होते. दोन महिने यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महिलांनी दोन महिन्याच्या कालावधीत आत्मसात केलेल्या शिवणकलेचे प्रदर्शन त्यांनी शिवलेल्या विविध प्रकारच्या कलाकृतींमधून प्रदर्शित करण्यात आले होते. हे प्रमाणपत्र वितरण गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व घरडा कंपनीचे सीएसआर प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले.
---

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58151 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top