कणकवली, खारेपाटणच्या नद्यांतील गाळ उपसा होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली, खारेपाटणच्या नद्यांतील गाळ उपसा होणार
कणकवली, खारेपाटणच्या नद्यांतील गाळ उपसा होणार

कणकवली, खारेपाटणच्या नद्यांतील गाळ उपसा होणार

sakal_logo
By

21776
सिंधुदुर्गनगरी : जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन देताना शिवसेना नेते संदेश पारकर.

नद्यांतील गाळ उपसा होणार

पारकर ः खारेपाटण, कणकवलीची प्रशासनाकडून दखल

कणकवली, ता.१४ : खारेपाटण येथील सूख नदी तसेच कणकवली शहरालगतच्या गड आणि जानवली नदीपात्रातील गाळ उपसा होणार आहे. गतवर्षी सारखी पूरस्थिती येऊन येथील व्यापारी, नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी हा गाळ उपसा होणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली. गाळ उपशासाठी निधी उपलब्‍धतेची ग्‍वाही आणि तसे निर्देश जिल्‍हा प्रशासनाला पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्‍याचेही पारकर म्‍हणाले.
कणकवली तालुक्‍यातील गड, जानवली आणि सूखनदीतील गाळ उपसा करण्याबाबतचे निवेदन संदेश पारकर यांनी आज जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना दिले. यानंतर श्री.पारकर म्‍हणाले, गतवर्षी झालेल्‍या अतिवृष्‍टीचा मोठा फटका खारेपाटण बाजारपेठेसह कणकवली शहरालाही बसला होता. अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये पुराचे पाणी गेल्‍याने व्यापारी आणि नागरिकांचे नुकसान झाले होते. यंदाच्या पावसाळ्यातही तशीच परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी या तीनही नदीपात्रातील गाळ उपसा करण्याची मागणी जिल्‍हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

पालकमंत्र्यांशी चर्चा
पारकर म्‍हणाले, ‘‘गाळ उपशाबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा झाली. यावेळी सामंत यांनी जानवली, गड आणि सूख नदीतील गाळ उपसा करण्यासाठी तातडीने निधी देण्याची ग्‍वाही दिली आहे. तसे निर्देशही प्रशासनाला दिले आहेत. त्‍यामुळे पावसाळ्यापूर्वी या नद्यांतील गाळ उपसा होईल आणि पूरस्थितीचे संकट दूर होण्याची शक्‍यता आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58153 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top