डोळ्यात मसाला फेकून वृद्धासह नातवाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोळ्यात मसाला फेकून वृद्धासह नातवाला मारहाण
डोळ्यात मसाला फेकून वृद्धासह नातवाला मारहाण

डोळ्यात मसाला फेकून वृद्धासह नातवाला मारहाण

sakal_logo
By

डोळ्यामध्ये मसाला फेकून
वृद्धासह नातवाला मारहाण

हरकुळ खुर्दमध्ये सहा जणांवर गुन्हे

कणकवली, ता.१४ : हरकुळ खुर्द -सुतारवाडी (ता. कणकवली) येथील महादेव बाळकृष्ण मेस्त्री (वय ७०) आणि त्यांचा नातू तुषार यांना डोळ्यात मसा फेकून मारहाण केल्याबाबत तेथीलच सहा जणांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंदकुमार वामन कुलकर्णी व त्याची पत्नी, बाळकृष्ण वामन कुलकर्णी, निरंजन नंदकुमार कुलकर्णी, स्वामी कुलकर्णी व त्याची आई, अशी संशयितांची नावे आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, घटना गुरुवारी (ता.१२) सकाळी साडेअकराच्या सुमारास हरकुळ खुर्द येथे घडली. तेथील एका जमिनीवरून मेस्त्री व कुलकर्णी यांच्यात वाद आहेत. महादेव हे नातवासह आंबे काढत असताना तेथे आलेल्या संशयितांनी त्यांना दांड्याने मारहाण करतानाच त्यांच्या डोळ्यात मसालाही फेकला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58157 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top