किर्लोस रामेश्वर सोसायटीवर शिवसेना पॅनेलचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किर्लोस रामेश्वर सोसायटीवर शिवसेना पॅनेलचे वर्चस्व
किर्लोस रामेश्वर सोसायटीवर शिवसेना पॅनेलचे वर्चस्व

किर्लोस रामेश्वर सोसायटीवर शिवसेना पॅनेलचे वर्चस्व

sakal_logo
By

किर्लोस रामेश्वर सोसायटीवर
शिवसेनेच्या पॅनेलचे वर्चस्व

अध्यक्षपदी भावे, उपाध्यक्ष गावडे

कणकवली, ता.१४ : किर्लोस येथील श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर शिवसेना पुरस्कृत गाव विकास पॅनेलने वर्चस्व प्राप्त केले. एकूण ११ पैकी १० जागा शिवसेना पॅनेलच्या उमेदवारांनी जिंकल्‍या. तर भाजप पुरस्कृत पॅनेलचा एक उमेदवार विजयी झाला. चेअरमनपदी स्वानंद अरुण भावे, व्हाईस चेअरमनपदी श्रीधर वसंत गावडे यांची निवड झाली.
या निवडीवेळी योगेश बाळकृष्ण लाड, जयसिंग अर्जुन वारंग, प्रवीण सोमा घाडीगांवकर, सुनिल वसंत लाड, गुरुनाथ दत्तात्रय चव्हाण, सुधीर श्यामसुंदर लाड, नूतन सुनिल घाडीगांवकर, प्रेमलता जनार्दन लाड, रवींद्र गोपाळ किर्लोस्कर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या चेअरमनपदी स्वानंद अरुण भावे यांची तर उपाध्यक्षपदी श्रीधर वसंत गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे किर्लोस सरपंच प्रदीप सावंत, उपसरपंच दीपक उर्फ बाबू किर्लोस्कर, पोलीस पाटील किशोर लाड, शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा उद्योजक प्रशांत उर्फ बाबा सावंत, माजी सरपंच पंढरी घाडीगांवकर, किर्लोस शिवसेना शाखाप्रमुख गणेश गावकर, अजित लाड व संस्था सचिव लक्ष्मण घाडीगावकर यांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58159 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top