
रत्नागिरी ः रत्नागिरीत ''द टॉकिंग फ्रेम्स'' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
-rat14p3.jpg
L21731
ःरत्नागिरीः द टॉकिंग फ्रेम या आंतराष्ट्रीय महोत्सवाबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. संतोष पाठारे, सुनील सुकथनकर, प्रकाश कुंटे. आदी
-----
रत्नागिरीत ''द टॉकिंग फ्रेम्स'' चित्रपट महोत्सव
प्रसन्न करंदीकर यांची माहिती; लघुपट स्पर्धाही भरणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः टीडब्ल्यूजे इव्हेंट्स आणि प्रभातचित्र मंडळ यांच्यातर्फे २० ते २२ मे ''द टॉकिंग फ्रेम्स'' या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे रत्नागिरीतील सिटीप्राईड चित्रपटगृह व गोगटे-जोगळेकर महाविद्यालय येथे आयोजन केले असल्याची माहिती फेस्टिवल डिरेक्टर प्रसन्न करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टीडब्ल्यूजे दी सोशल रिफॉर्म्स ही संस्था विविध सामाजिक क्षेत्रात चिपळूण, देवरूख, सातारा व पुणे येथे कार्यरत असून, त्या चित्रपट महोत्सवानिमित्त रत्नागिरी येथे आपले कार्य सुरू करत आहे. नाट्य आणि संगीतक्षेत्रासाठी एक हक्काचा प्रेक्षकवर्ग रत्नागिरीत आहे. तसेच उत्तम चित्रपटांसाठीदेखील चोखंदळ प्रेक्षकवर्ग निर्माण व्हावा, हा या चित्रपट महोत्सवामागील हेतू आहे. या महोत्सवात गिल्टी (डॅनिश) ला मिझरेबल (फ्रेंच), यंग ( फ्रेंच) या कान आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पारितोषिक विजेते चित्रपट तसेच निवास-मराठी, आदाल-मल्याळम, सुमित्रा भावे एक समांतर प्रवास, मराठी माहितीपट यांचाही समावेश केला आहे.
महोत्सवाचा समारोप प्रकाश कुंटे दिग्दर्शित शक्तिमान या अप्रदर्शित चित्रपटाने होणार आहे. या महोत्सवाच्या निमिताने लघुपट स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील निवडक २० लघुपटांचे परिक्षण राष्ट्रीय पारितोषक विजेते दिग्दर्शक सुनील सुकथनकर आणि प्रकाश कुंटे हे करणार आहेत. महोत्सवाच्या समारोपात, सर्वोत्कृष्ट लघुपट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, छायाचित्रकार, संगीत, ध्वनीमुद्रक, संकलक यांना गौरविणार असून, या लघुपटांचे प्रदर्शन करणार आहे. महोत्सवात ''कला आरंभ या चित्रकारांच्या चमूतर्फे चित्रपटविषयक चित्रप्रदर्शन भरणार आहे. या महोत्सवात सुनील सुकथनकर, अनिरुद्ध सिंग, प्रकाश कुंटे, शरीफ ईसा हे दिग्दर्शक आणि चित्रपटातील कलावंत उपस्थित राहणार आहेत.
---
चौकट..
१५ मे पासून नोंदणी
महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी सिटीप्राईड तसेच गोगटे-जोगळेकर महाविद्यालय येथे १५ मे पासून सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत सुरू राहणार आहे. टॉकिंग फ्रेम्स फिल्म फेस्टिवलला प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन फेस्टिवल डिरेक्टर करंदीकर, फेस्टिवल क्युरेटर डॉ. पाठारे, क्रीएटिव्ह डिरेक्टर शोनील येलट्टीकर यांनी केले आहे.
---------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58161 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..