भाजी मार्केटला आधी विरोध का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजी मार्केटला आधी विरोध का?
भाजी मार्केटला आधी विरोध का?

भाजी मार्केटला आधी विरोध का?

sakal_logo
By

21783
बंडू हर्णे


भाजी मार्केटला आधी विरोध का?

उपनगराध्यक्ष हर्णे : कणकवलीप्रश्नी सुशांत नाईकांच्या टिकेला उत्तर

कणकवली, ता.१४ : शहरात भाजी मार्केट होऊ नये यासाठी पहिला विरोध नगरपंचायतीचे विरोधी पक्ष गटनेते सुशांत नाईक यांनीच केला होता. आता तेच भाजी मार्केटच्या प्रश्‍नी आमदार नीतेश राणे यांच्यावर टीका करत आहेत. आपले व्यावसायिक हित पाहून सोयीस्कर भूमिका घेणाऱ्या नाईकांची सर्व बेकायदेशीर कामे लवकरच बाहेर काढू, असा इशारा उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी आज दिला.
उपनगराध्यक्ष दालनात बोलताना श्री. हर्णे म्‍हणाले, भाजी विक्रेत्‍यांनी महामार्गावर बसू नये, तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आमदार नीतेश राणे यांनी नगरपंचायत सभागृहात संयुक्‍त बैठक घेतली. त्‍यानंतर बैठकीत ठरल्‍याप्रमाणे कार्यवाही देखील सुरू झाली. ही बाब सुशांत नाईक यांना आवडली नसल्‍याने ते आमदार नीतेश राणेंवर टीका करत आहेत. कणकवली शहरात भाजी मार्केटची उभारणी होऊ नये यासाठी पहिला विरोध नाईक यांनीच केला होता. कचरा टेंडरचा ठेका मिळावा यासाठी त्‍यांनी धुळे येथील एका संस्थेला कचरा टेंडर भरायला लावले. एवढेच नव्हे तर शहरात होत असलेल्‍या नव्या प्रकल्‍पांनाही ते छुपा विरोध करून शहरवासीयांची गैरसोय करत आहेत.

आतापर्यंत जनतेची फसवणूकच
हर्णे म्‍हणाले, कणकवली शहरात अनधिकृत बांधकामे करून शहरवासीयांची फसवणूक करण्याचे काम आतापर्यंत नाईक यांनी केले. त्‍यांनी उभारलेल्‍या अनेक निवासी आणि व्यापारी संकुलातील बेकायदेशीर कामांची माहिती आमच्याकडे आहे. वेळ आल्‍यावर ती माहिती सर्व जनतेसमोर मांडू. आमदार नितेश राणे हे कणकवलीवासीयांचे हित जपण्यासाठी, शहरवासीयांना योग्य सुविधा मिळण्यासाठी जनतेच्या सुरुवातीपासून संपर्कात आहेत. त्‍यामुळे नाईक यांनी शहरवासीयांची चिंता करू नये.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58167 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top