
रत्नागिरी-कोसुंबला पंचवार्षिक गोंधळ उत्साहात
कोसुंबला पंचवार्षिक गोंधळ उत्साहात
साडवली, ता. १४ः संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब मधलीवाडी येथील (कै.) रत्नाजी कृष्णाजी यशवंतराव जाधव कुटुंबीयांचा पंचवार्षिक गोंधळ चौसोपी मानकरी प्रकाश गोपाळ जाधव यांच्या निवासस्थानी उत्साहात झाला.
यापूर्वी २०१४ मध्ये गोंधळाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर २०१९ मध्ये परंपरेपमाणे हा कार्यक्रम होणार होता. मात्र, चौसापी घराण्याच्या आधारस्तंभ सुनीता गोपाळ जाधव यांचे निधन झाले व पुढे दोन वर्षे कोरोना परिस्थितीमुळे तो होऊ शकला नाही. तो सन २०२२ मध्ये शुकवारी (ता. ६) मे रोजी उत्साहात पार पडला. या दिवशी सकाळी यजमानी प्रकाश जाधव यांनी देवपूजा करून नैवेद्य दाखवला. सुमारे २७ नवोदित दाम्पत्ये यांच्याकरिता या गोंधळाचे आयोजन केले होते. या कुटुंबीयांच्या शिवाय हातीव, तळेकांटे, उमरे, मुंबई, ठाणे, बडोदा, सुरत अहमदाबाद, बलसाड, आणंद, मेहसाणा आदी ठिकाणाहून कुटुंबातील अन्य सदस्य हजर होते. मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र रघुनाथ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विविध कमिट्या स्थापन करण्यात आल्या होत्या.
...
हौशी दाम्पत्ये यांना नाचवले..
रात्री ८ वा. देव्हारा बाहेर काढण्यात आला. कार्यक्रमाचा मुख्य भाग तेल घालणे व दिवटी नाचवणे हा होता. प्रथम नवविवाहित दाम्पत्ये, यानंतर त्यांचे आई-वडील, माहेरवाशिणी व त्यांची मुले व त्यानंतर इतर हौशी दाम्पत्ये यांना क्रमाने नाचवण्यात आले. रात्री १० वा. महाप्रसाद व त्यानंतर ११ वा. गोंधळ कथा सांगण्यात आली. उत्तररात्री संपून देव्हारा मुळस्थानी वाजतगाजत नेण्यात आला व गोंधळ कार्यक्रमाची सांगता झाली.
-----------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58168 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..