महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार हवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार हवे
महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार हवे

महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार हवे

sakal_logo
By

21792
मालवण ः आंब्यांचा हार घालून डॉ. प्रमोद सावंत यांचा सत्कार करताना माजी खासदार नीलेश राणे.


महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार हवे

डॉ. प्रमोद सावंत ः मालवण भाजप कार्यालयाला भेट

मालवण, ता. १४ ः गोवा, कर्नाटक या महाराष्ट्राच्या लगत असलेल्या राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा अधिकाधिक लाभ जनतेपर्यंत पोहचविणे सुलभ होत आहे. महाराष्ट्रातही लवकरच डबल इंजिनचे सरकार यावे, अशी भावना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे व्यक्त केली.
अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या ३२ व्या अधिवेशनानिमित्त येथे आलेल्या मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी येथील भाजप कार्यालयास भेट दिली. या वेळी भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार नीलेश राणे यांनी मुख्यमंत्री सावंत यांचा भव्य सत्कार केला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाऊ सामंत, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, विजय केनवडेकर, उद्योजक दीपक परब, विलास हडकर, विशाल परब, राजू आंबरेकर, आबा हडकर, जॉन नरोना, अजय शिंदे, दीपक सुर्वे, प्रकाश मेस्त्री, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, शहराध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिडये, महेश सारंग, दाजी सावजी, भाई मांजरेकर, प्रमोद करलकर, बाबू कदम, महिला आघाडी शहर अध्यक्षा चारुशीला आचरेकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, पूजा वेरलकर, माधुरी बांदेकर, नमिता गावकर आदी उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणाले, ‘‘कार्यकर्ता ते मुख्यमंत्री, असा माझा प्रवास भाजपमुळे शक्य झाला. जनतेचा पाठिंबा मिळाला. पक्षाने नेहमीच विविध जबाबदारी देऊन विश्वास दाखविला. आज दुसरी टर्म मुख्यमंत्री म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत आहे. केंद्रात सरकारच्या माध्यमातून प्रभावीपणे काम होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान कामांमुळे अधिक ऊर्जा मिळते. आपल्यासारखी ऊर्जा महाराष्ट्रात मिळावी, यासाठी येथेही डबल इंजिन सरकार गरजेचे आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून देशभर चांगले काम सुरू आहे. गोवा राज्यातही त्यांनी गुंतवणूक करण्याची तयार दर्शविली आहे. केंद्र व राज्याच्या माध्यमातून जनहिताचे चांगले काम करण्याचा आपला प्रयत्न आहे.

सावंतांचा आदर्श कार्यकर्त्यांमध्ये
नीलेश राणे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री म्हणून डॉ. सावंत यांचा आदर्श कार्यकर्त्यांमध्ये आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांच्या साध्या राहणीमानाचे कौतुक वाटते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत. बाहेर पडले, तर काय बोलतात ते समजत नाही. भाजपमध्ये प्रत्येक गोष्टीचे महत्त्व असते. सावंत यांनी मालवण दौऱ्यावर असताना भाजप कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. जनतेशी, कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेले नेतृत्व यातून स्पष्ट होते.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58178 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top