राजापूर ःगाळ उपशासाठी राणेंनी दिला पोकलेन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ःगाळ उपशासाठी राणेंनी दिला पोकलेन
राजापूर ःगाळ उपशासाठी राणेंनी दिला पोकलेन

राजापूर ःगाळ उपशासाठी राणेंनी दिला पोकलेन

sakal_logo
By

-rat14p24.jpg
21762
ः राजापूर ः माजी खासदार नीलेश राणेंनी दिलेल्या पोकलेनमुळे अर्जुना नदीपात्रातील गाळ उपशाला सुरवात झाली आहे.
-----------------
अर्जुना नदीतील गाळ उपशासाठी
भाजप नेते राणेंनी दिला पोकलेन

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १४ ः तालुक्यातील रायपाटण येथील अर्जुना नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्यास सहकार्य करण्याच्या आश्‍वासनाची पूर्ती करताना भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी स्वः खर्चाने पोकलेन उपलब्ध करून दिला आहे. त्याच्या सहाय्याने आजपासून रायपाटण येथे नदीपात्रामध्ये गाळ उपशाला सुरवात झाली आहे.
अर्जुना नदीपात्रातील आज झालेल्या गाळउपशाच्या आरंभाच्यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, समीर खानविलकर, रायपाटण सरपंच महेंद्र गांगण, मनोज गांगण, भास्कर गांगण, रवींद्र गांगण, हरिश्चंद्र पांचाळ, आबा गांगण, प्रसाद पळसुळेदेसाई, भाई गांगण, प्रकाश पाताडे, रामदास गांगण, तात्या गांगण, कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
तालुक्यातील अर्जुना नदीमध्ये रायपाटण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचा संचय झालेला आहे. त्यातून पावसाळ्यामध्ये वारंवार पूरस्थिती निर्माण होऊन त्याचा फटका रायपाटणवासियांना बसतो. त्यामुळे नदीपात्रातील गाळाचा उपसा व्हावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून शासनाकडे केली आहे. मात्र, त्यांच्या मागणीची अद्यापही दखल घेतलेली नाही. नदीपात्रातील गाळ उपशाचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी रायपाटण येथील ग्रामस्थांनी माजी खासदार राणे यांच्याकडे केली होती. त्यावेळी दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करताना माजी खासदार राणे यांनी स्वः खर्चाने पोकलेन उपलब्ध केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58180 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top