तालीमखाना मार्गावर एकेरी वाहतूक सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तालीमखाना मार्गावर एकेरी वाहतूक सुरू
तालीमखाना मार्गावर एकेरी वाहतूक सुरू

तालीमखाना मार्गावर एकेरी वाहतूक सुरू

sakal_logo
By

तालीमखाना मार्गावर एकेरी वाहतूक सुरू
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १४ ः शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक या मुख्य रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करत रस्ता बंद केल्याप्रकरणी तालुका भाजपाच्या वतीने दोन दिवसांपूर्वी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने ग्रामीण रुग्णालयात येणार्‍या रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी तत्काळ रिक्षा व दुचाकीसाठी एकेरी वाहतुकीचे नियोजन केले आहे. शहरातील जकातनाका ते जवाहरचौक या मुख्य रस्ताच्या रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यालगत असलेल्या पाणीपुरवठा वाहिनीच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक बंद ठेवली आहे; मात्र त्यामुळे नागरिकांसह राजापूर ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्‍या रुग्णांची गैरसोय होत होती. याबाबत भाजपने आवाज उठवून मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58181 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top