खेड ः शंभर वर्षाहून अधिक काळ राखणार जातीय सलोखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः शंभर वर्षाहून अधिक काळ राखणार जातीय सलोखा
खेड ः शंभर वर्षाहून अधिक काळ राखणार जातीय सलोखा

खेड ः शंभर वर्षाहून अधिक काळ राखणार जातीय सलोखा

sakal_logo
By

-rat14p16.jpg
L21748
ः खेड ः ग्रामसभेप्रसंगी उपस्थित सर्वधर्मीय समाजबांधव.
----------------
काही सुखद--लोगो
......
पुढील शंभर वर्षही राखणार जातीय सलोखा

निळीक ग्रामपंचायतीचा खास ग्रामसभेत ठराव; ठराव राज्य शासनाला पाठवणार
खेड, ता. १४ : मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा यावरून राज्यात वातावरण ढवळून निघाले असताना खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील निळीक ग्रामपंचायतीने पुढील शंभर वर्षापेक्षा अधिक काळ गावात जातीय सलोखा राखण्याचा एकमुखी निर्णय घेत, असा ठराव ग्रामसभेत केला आहे.
ग्रामीण भागातील नागरिक आपल्या धर्माच्या रूढी व परंपरा जतन करून प्रत्येक जातीधर्मातील लोकांना जातीय सलोखा राखण्यासाठी एकत्र येऊन धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे टाकत गावात जातीय सलोखा राखण्यासाठी खास ग्रामसभेचे आयोजन केले. या ग्रामसभेला दोन्ही समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील शंभर वर्षाच्या पेक्षा अधिक काळ गावात जातीय सलोखा व एकोपा राहण्याचा एकमुखी निर्णय घेत असा ठराव राज्य शासनाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. या गावाला १२ वर्षांपूर्वी महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार प्राप्त झाला आहे. २००८ मध्ये आदर्श गाव म्हणूनही गावाला पुरस्कार मिळाला आहे. गावात आजपर्यंत जाती-धर्मात वादात व तंटे झालेली नाहीत. प्रत्येक जातीधर्माच्या रूढी-परंपरा राखूनच उत्सव साजरे होत आहेत. या वेळी सरपंच अब्दुल चौगुले, उपसरपंच रोजीबी देसाई, तंटामुक्त समिती अध्यक्ष जलाल कादरी, बौद्ध समाजसेवा संघ अध्यक्ष अनिल जाधव, कुणबी समाज अध्यक्ष सुनील भुवड, मराठा समाज अध्यक्ष दीपक जाधव, आदम चौगुले, सईदा खान, संध्या खोचरे, समिता भुवड, बाळकृष्ण पाटणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
-----------------
कोट
गावात सर्वधर्म समभावाची जपणूक करून जातीय एकोपा कायम टिकवून ठेवण्यासह गावहितासाठी एकमुखी निर्णय घेण्यात आला असून ग्रामस्थांचा सार्थ अभिमान वाटत आहे.
- अब्दुल रहमान चौगुले, सरपंच, निळीक
---
आजपर्यंत गावी जाती-धर्मात वाद व तंटे झाले नाहीत
गावाला १२ वर्षांपूर्वी महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार
२००८ मध्ये आदर्श गाव म्हणूनही मिळाला पुरस्कार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58183 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top