
खेड ः जागर कदम वंशाचा
-rat14p30.jpg
21796
ःखेड ः जागर कदम वंशाचा या पुस्तकाचे प्रकाशन करताना मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदास कदम, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराजे देसाई, खासदार गजानन किर्तीकर.
(सिद्धेश परशेट्ये ः सकाळ छायाचित्रसेवा )
--------------
जागर कदम वंशाचा पुस्तक
इतिहासकारांनाही मार्गदर्शकः मंत्री सामंत
खेड, ता. १४ ः जागर कदम वंशाचा पुस्तक प्रकाशन व धर्मवीर आनंद दिघे यांचा सिनेमा प्रकाशन हा एक योगायोग आहे. जागर कदम वंशाचा हे पुस्तक महाराष्ट्रातील १२ हजारांहून अधिक ग्रंथालयात ठेवण्यात येईल. हे पुस्तक फक्त कदम घराण्यालाच नाही तर पुढील तरुणांना, इतिहासकारांना एक मार्गदर्शक ठरणार आहे, यात शंका नाही, असे मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यावर जागर कदम वंशाचा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, आमदार जयंत पाटील, इतिहासकार सतीश कदम, आमदार योगेश कदम, सिद्धेश कदम, प्रकाश सुर्वे, केशवराव भोसले उपस्थित होते. खासदार गजानन किर्तीकर यांनी सांगितले, रामदासभाईंचा संपूर्ण जीवनपटच मी पाहिला आहे, अनुभवला आहे. आपल्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीतील भरीव संघटनात्मक काम केले आहे. भाई हे कांदिवलीचे पहिले शिवसेनेचे शाखाप्रमुख होय. हा प्रवास थक्क करणारा आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58184 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..