वेर्ले येथील शाळेत शतक महोत्सवास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेर्ले येथील शाळेत शतक महोत्सवास प्रारंभ
वेर्ले येथील शाळेत शतक महोत्सवास प्रारंभ

वेर्ले येथील शाळेत शतक महोत्सवास प्रारंभ

sakal_logo
By

21799
वेर्ले ः कार्यक्रमाचे उद्‍घाटन करताना गोविंद लिंगवत. शेजारी सरपंच सुरेश राऊळ, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके आदी.

वेर्लेतील जिल्हा परिषद शाळेत
शतक महोत्सवाला सुरुवात
सावंतवाडी ः येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेर्ले क्र. १ चे २०२२-२३ हे शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. ज्येष्ठ माजी विद्यार्थी गोविंद लिंगवत यांच्या हस्ते सोहळ्याचा प्रारंभ गुरुवारी करण्यात आला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वेर्ले सरपंच सुरेश राऊळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके तसेच मुख्याध्यापक भाग्यश्री राणे, सौ. राणे, उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष राऊळ, वेर्ले पोलिस पाटील अरुण लिंगवत, लाडजी राऊळ, बाबा राऊळ, गणेश घाडी आदी उपस्थित होते. गावाला शाळेचा अभिमान असावा, शाळेला गावाचा आधार असावा, हे ध्येय ठेवून २०२२-२३ हे वर्ष शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे.
...............
पोलिस कर्मचारी असोसिएशनची
१७ ला वार्षिक सर्वसाधारण सभा
कणकवली ः निवृत्त पोलिस अधिकारी कर्मचारी असोसिएशन सिंधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. १७) सकाळी अकराला पोलिस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्गच्या सभागृहात आयोजित केली आहे. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे मार्गदर्शन करणार आहेत. निवृत्त अधिकारी, पोलिस कर्मचारी तसेच मृत कर्मचा‍ऱ्यांच्या नातेवाईकांनी सभेला उपस्थित राहावे. ज्या निवृत्त कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या काही समस्या असतील, तर त्यांनी आगावू व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर पाठवाव्यात. त्याचप्रमाणे मागील सभेत जे मुद्दे उपस्थित केले होते, त्यांची पूर्तता झालेली नसल्यास तेही या ग्रुपवर कळवावे. ज्यांच्याकडे व्हॉटस्अ‍ॅप नाही, त्यांनी सहकाऱ्यांमार्फत अथवा लेखी स्वरुपात आगावू पोहोचतील असे पाठवावेत, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन राणे यांनी केले आहे.
---
‘बीएफए’ प्रवेशासाठी मुदतवाढ
सावंतवाडी ः कला संचालनालय मुंबईकडून घेण्यात येणारी बी.एफ.ए. पदवी प्रवेश परीक्षा (एम.ए.एच.-ए.ए.सी.सीईटी २०२२) प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता १६ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कलाक्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अंतिम तारखेअगोदर प्रवेश अर्ज करण्याचे आवाहन बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयाकडून केले आहे. बी. एस. बांदेकर कला विद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव सीईटी परीक्षा केंद्र आहे. परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी प्राचार्य दिलीप धोपेश्वरकर, संतोष मोरजकर, सिध्देश नेरुरकर यांच्याशी संपर्क साधावा.
--
तुळसला ३० पासून जैतिर वार्षिकोत्सव
वेंगुर्ले ः दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान, तुळस ग्रामदैवत श्री जैतिर देवाचा वार्षिक उत्सव ३० मेपासून सुरू होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. देवाच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगाव, सिंधुदुर्ग व नजीकच्या गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव मोठ्या प्रमाणात झाला नव्हता; मात्र कोरोना संसर्ग संपुष्टात आल्याने पूर्वीप्रमाणेच उत्सव होणार आहे. सलग ११ दिवस हा उत्सव चालेल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58188 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top