विजयदुर्गमधून मुंबई मार्गावर दोन एसटी बसेसची सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजयदुर्गमधून मुंबई मार्गावर दोन एसटी बसेसची सुविधा
विजयदुर्गमधून मुंबई मार्गावर दोन एसटी बसेसची सुविधा

विजयदुर्गमधून मुंबई मार्गावर दोन एसटी बसेसची सुविधा

sakal_logo
By

विजयदुर्गमधून मुंबई मार्गावर
दोन एसटी बसेसची सुविधा
देवगड, ता. १४ ः विजयदुर्ग (ता. देवगड) आगारातून मुंबई मार्गावर दोन एसटी बसेस सोडल्या आहेत. प्रवाशांनी याचा लाभ घेतल्यास भारमान राहून एसटी फेऱ्या नियमित सुरू राहण्यास मदत होईल, असे आवाहन विजयदुर्ग येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रेसीस फर्नांडिस यांनी केले आहे. फर्नांडिस यांच्या माहितीनुसार, विजयदुर्ग आगारातून दुपारी तीनला मुंबई बस सोडण्यात येते. ही गाडी वाडा, नाडण, तळेरे मार्गे मुंबई अशी धावते. तसेच विजयदुर्गहून बोरीवली मार्गावर दुपारी पावणेचारला बस सोडण्यात येते. पडेल कँटीन, कात्रादेवी, जैतापूर, पावस, रत्नागिरी, चिपळूण अशी बस धावते. हीच बस बोरीवली येथून सायंकाळी सहाला सोडण्यात येते. सध्या आरामगाडीच्या तिकिटापेक्षा एसटीचे तिकीट सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे आहे. त्यामुळे याचा विचार करून या फेऱ्यांना प्रवाशांनी प्रतिसाद दिल्यास कायमस्वरुपी ही फेरी सुरू राहून विजयदुर्ग परिसरातील प्रवाशांची सोय होईल. त्यामुळे या फेरीचा लाभ घेण्याचे आवाहन फर्नांडिस यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58193 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top