नालेसफाई अंतिम टप्प्यात; ४० कर्मचारी राबताहेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नालेसफाई अंतिम टप्प्यात; ४० कर्मचारी राबताहेत
नालेसफाई अंतिम टप्प्यात; ४० कर्मचारी राबताहेत

नालेसफाई अंतिम टप्प्यात; ४० कर्मचारी राबताहेत

sakal_logo
By

-rat14p27.jpg
L21793
-रत्नागिरी ः नालेसफाईचे काम करताना पालिकेचा जेसीबी.
---------
नालेसफाई अंतिम टप्प्यात; ४० कर्मचारी राबताहेत

पालिकेकडून सफाई; २०० कि.मी.चे नाले, वहाळासह पऱ्हे
रत्नागिरी, ता. १४ ः पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई यंदा पालिका प्रशासनाकडून प्रभावीपणे होताना दिसत आहे. नाले, वहाळ, पऱ्ह्यांची सफाई आता अंतिम टप्प्यात आहे. पालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक तुषार बाबर यांनी फेब्रुवारी महिन्यातच या सफाईला चालना दिली. त्यासाठी पहिल्यांदाच ३ जेसीबी, ३ ट्रॅक्टर आणि ४० सफाई कामगारांकडून ही कार्यवाही सुरू असून आठवडाभरात हे काम पूर्ण होईल, असे पालिका प्रशासनाने सांगितले.
यावर्षी मान्सून पंधरा दिवस आधी दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शहरातील पावसापूर्वीच्या तयारीला पालिका प्रशासनाने गती दिली आहे. रत्नागिरी शहरातील नाले, वहाळ, पऱ्ह्यांची स्वच्छता करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. ज्या गटारांच्या किंवा वहाळांच्या ठिकाणी जाता येत नाही आणि छोटी गटारे आहेत, तेथे सफाई कामगारांकडून स्वच्छता केली जात आहे.
...
३ जेसीबी आणि ३ ट्रॅक्टर
शहरात अनेक नाले, वहाळ, पऱ्हे असून त्यांची एकूण लांबी २०० कि.मी. इतकी आहे. आत्तापर्यंत सफाई कामगारांच्यामार्फत हे काम केले जात होते; परंतु यावर्षी सफाई कामगारांच्या मदतीला ३ जेसीबी आणि ३ ट्रॅक्टर आहेत. या यांत्रिकी साधनांच्या मदतीने अनेक ठिकाणी स्वच्छता केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58195 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top