राधाकृष्णमध्ये शिक्षणमंत्र्यांनी पाहिला धर्मवीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राधाकृष्णमध्ये शिक्षणमंत्र्यांनी पाहिला धर्मवीर
राधाकृष्णमध्ये शिक्षणमंत्र्यांनी पाहिला धर्मवीर

राधाकृष्णमध्ये शिक्षणमंत्र्यांनी पाहिला धर्मवीर

sakal_logo
By

-rat14p31.jpg
L21797
रत्नागिरी ः सिटी प्राईड चित्रपटगृहाच्या प्रारंभाप्रसंगी बोलताना मंत्री उदय सामंत.
-------------
राधाकृष्णमध्ये शिक्षणमंत्र्यांनी पाहिला धर्मवीर

चित्रपटगृहाचा प्रारंभ; पहिल्या शोचा घेतला आनंद
रत्नागिरी, ता. १४ ः कोरोना महामारीमुळे अडीच वर्षे बंद असलेले राधाकृष्ण चित्रपटगृह म्हणजे सिटी प्राईड शुक्रवारपासून (ता. १३) सुरू झाले. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी या विषयात लक्ष घालून सिटी प्राईड सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. धर्मवीर या चित्रपटाच्या पहिल्या शोचा आनंद त्यांनी घेतला.
कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेतला. सिटी प्राईड सुरू न झाल्याने तिथे काम करणारा कर्मचारी वर्ग अडचणीत आला होता. त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यवसायावर त्याचा परिणाम झाला होता. याशिवाय सर्वसामान्य लोकांना हे चित्रपटगृह सोईचे होते. ते पुन्हा सुरू व्हावे, यासाठी अजय गांधी, बाळू रेडीज, नितीन लिमये या मंडळींनी पुढाकार घेतला. मंत्री उदय सामंत यांच्याकडे गुढीपाडव्याला हा विषय मांडला. त्यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे चित्रपटगृह सुरू करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी सिटी प्राईडचे मालक चाफळकर यांच्याशी चर्चा केली. चाफळकर यांनीदेखील सिटी प्राईड सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यांनी चित्रपटगृहाची तांत्रिक दुरुस्ती करून घेतली आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत धर्मवीर या चित्रपटाने त्याचा आरंभ केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58196 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top