
पान एक-सिंधुदुर्गात प्रक्रिया उद्योगाला चालना हवी
21791
डॉ. प्रमोद सावंत (मध्यभागी)
सिंधुदुर्गने फळ प्रक्रियेवर
लक्ष केंद्रित करावे
प्रमोद सावंत; जिल्ह्यासाठी गोवा मार्केट उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १४ ः सिंधुदुर्गने गोव्याला बाजारपेठ म्हणून बघावे. जिल्हावासीयांनी फळ प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करावे. यासाठी गोवा मार्केट उपलब्ध आहे, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे व्यक्त केले.
जिल्हा बँकेला सदिच्छा भेट दिल्यानंतर पत्रकार परिषद ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवित असलेल्या सामान्यांसाठींच्या योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा. ‘सबका साथ सबका विकास’, ‘आत्मनिर्भर भारत’ मध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा. एवढे उत्पन्न घ्यावे की दक्षिण आफ्रिकेकडून काजू आणावा लागू नये. जिल्हावासीयांनी प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करावे. यासाठी गोवा मार्केट उपलब्ध आहे.’’डॉ. सावंत म्हणाले, ‘‘महामार्गाचे रखडलेले काम पावसाळ्यापूर्वी केले जाईल. संबंधित कंत्राटदाराला तशा सूचना दिल्या जातील. पंतप्रधान मोदी यांचे काम लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर करीत आहेत. राज्य सरकार या योजना किती लोकांपर्यंत पोचविते हे माहीत नाही; मात्र जिल्हा बँक पोचविते याचे कौतुक आहे.’’
गोवा मुक्ती संग्रामात जिल्ह्यातील ज्यांनी ज्यांनी भाग घेतला, त्यांना अद्यापही लाभ मिळत नाही, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘‘अशांनी गोवा सरकारशी संपर्क साधावा. सर्व पडताळणी करून त्यांना निश्चितच न्याय दिला जाईल.’’ औरंगजेबाच्या कबरीसमोर ओवेसी नतमस्तक झाले, याबाबत विचारले असता कोणी काय करावे हा ज्याचा -त्याचा प्रश्न आहे, असे सांगत त्यांनी राजकीय भाष्य करण्याचे टाळले.
मोपा विमानतळाचे १५ ऑगस्टला उद्घाटन
सिंधुदुर्गच्या सीमेवर मोपा येथे विमानतळाचे काम सुरू आहे. या संदर्भात डॉ. सावंत म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाचे येत्या १५ ऑगस्टला उद्घाटन होणार असून, या विमानतळाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यासह लगतच्या सर्व जिल्ह्यांना फायदा होणार आहे.’’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58206 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..