हर्णै-सुवर्णपालवीला पहिल्या दिवशी थंडा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्णै-सुवर्णपालवीला पहिल्या दिवशी थंडा प्रतिसाद
हर्णै-सुवर्णपालवीला पहिल्या दिवशी थंडा प्रतिसाद

हर्णै-सुवर्णपालवीला पहिल्या दिवशी थंडा प्रतिसाद

sakal_logo
By

-rat14p29.jpg
21795
हर्णै ः कोकण कृषी विद्यापीठाच्या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांची उपस्थिती कमी दिसून आली.
----------------
सुवर्णपालवीला दीड हजार शेतकऱ्यांची भेट

पहिल्या दिवशी थंडा प्रतिसाद; महोत्सव पाच दिवस
हर्णै, ता. १४ ः लाखभर शेतकऱ्यांच्या भेटीची अपेक्षा असलेल्या सुवर्ण पालवी कृषी महोत्सवाला पहिल्या दिवशी दीड हजार शेतकऱ्यांनी भेट दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुवर्ण पालवी या कृषी महोत्सवाचे शुक्रवारी (ता. १३) राज्यपाल, कृषिमंत्री यांच्या उपस्थितीत उदघाटन झाले. महोत्सवात फक्त कोकणातूनच नव्हे तर राज्यभरातून शेतकरी आणण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. यातील मुख्य भूमिका कृषी विभागासह इतर संलग्न स्थानिक स्वराज्य संस्थांनाही देण्यात आली होती; मात्र इतर विभागांनी महोत्सवातील आर्थिक नियोजनात सहभागी होण्यास ऐनवेळी नकार दिल्याने कोकण स्तरावरील या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.
..
चौकट
एक लाख शेतकरी उपस्थितीची अपेक्षा फोल
महोत्सवासंदर्भात कोकण स्तरावर उच्चस्तरीय बैठकी घेऊन नियोजन केले होते. त्याच अनुषंगाने कोकण कृषी विद्यापीठाने किमान एक लाख शेतकरी महोत्सवाला उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला होता; मात्र पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला पहिल्या दिवशी फक्त दीड हजार शेतकऱ्यांनी हजेरी लावली.
---------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58214 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top