‘विजयदुर्ग ते कासार्डे रस्त्याची दुरुस्ती करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘विजयदुर्ग ते कासार्डे रस्त्याची दुरुस्ती करा’
‘विजयदुर्ग ते कासार्डे रस्त्याची दुरुस्ती करा’

‘विजयदुर्ग ते कासार्डे रस्त्याची दुरुस्ती करा’

sakal_logo
By

‘विजयदुर्ग ते कासार्डे
रस्त्याची दुरुस्ती करा’
देवगड, ता.१४ ः विजयदुर्ग-कासार्डे (ता.देवगड) मार्गावरील पडेल कँटीन ते वाघोटण भागातील रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी गिर्ये येथील सामाजिक कार्यकर्ते दिलदार चौगुले यांनी केली आहे. किल्ले विजयदुर्गला पर्यटकांची मोठी वर्दळ असते. सध्या उन्हाळी हंगाम असल्याने विजयदुर्गला पर्यटकांची ये-जा सुरू आहे. अशावेळी विजयदुर्ग-कासार्डे मार्गावरील पडेल कँटीन ते वाघोटणपर्यंतचा रस्ता खराब झाला असल्याने स्थानिक वाहन चालकांबरोबरच पर्यटकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पर्यटकांमुळे स्थानिक उलाढालीत वाढ होते; मात्र रस्ते खराबीमुळे पर्यटकांची संख्या रोडावल्यास उद्योग व्यवसायावर त्याचा परिणाम होऊ शकतो. याकडे बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58218 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top