कणकवली : कातडे जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : कातडे जप्त
कणकवली : कातडे जप्त

कणकवली : कातडे जप्त

sakal_logo
By

बिबट्याचे कातडे
कणकवलीजवळ जप्त
कणकवली, ता. १४ : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कणकवली तालुक्यात दारूम या गावातून आज पोलिसांनी बिबट्याचे कातडे जप्त केले. या प्रकरणी संशयितांचा शोध सुरू असून तालुक्‍यातच बिबट्याची शिकार झाल्‍याची शक्‍यता आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः दारूममध्ये बिबट्याचे कातडे असून लवकरच त्‍याची विक्री केली जाणार असल्‍याची माहिती मिळाली. त्‍यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने गावात जाऊन बिबट्याचे कातडे जप्त केले. या प्रकरणातील संशयितांकडून माहिती घेतली जात आहे. या बिबट्याची शिकार केव्हा झाली तसेच शिकारीत कोण सहभागी आहेत, तसेच कातडे कुणाला विकले जाणार होते, अशा दिशेने तपास सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58228 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top