सावंतवाडीत हिंदू एकता दिंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत हिंदू एकता दिंडी
सावंतवाडीत हिंदू एकता दिंडी

सावंतवाडीत हिंदू एकता दिंडी

sakal_logo
By

21822
सावंतवाडी ः एकता दिंडीत सहभागी हिंदू बांधव.

सावंतवाडीत हिंदू एकता दिंडी

शहर भगवेमय ः ‘सनातन’चा पुढाकार, चिमुकल्यांच्या वेशभूषा लक्षवेधी

सावंतवाडी, ता. १४ ः सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज भगवे झेंडे व वेशभूषा साकारत सनातन संस्थेच्यावतीने भव्य हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
सनातन संस्थेच्यावतीने हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवा निमित्ताने संपूर्ण भारतात हिंदूराष्ट्र जागृती अभियान राबविले जात आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून तसेच हिंदूंमधील ब्राह्मतेज वाढवून त्यांना हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत करण्यासाठी येथील शहरात आज भव्य हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. या एकता दिंडीचा येथील गवळी तिठा येथून प्रारंभ झाला. त्यानंतर आत्मेश्वर मंदिर, उभा बाजार, गांधी चौक, मुख्य बाजारपेठ, मिलाग्रीस हायस्कूल ते पंचम खेमराज महाविद्यालय, नगरपरिषद, श्रीराम वाचन मंदिर या मार्गाने जाऊन येथील बसस्थानकाजवळ दिंडीची सांगता झाली. मोठ्या संख्येने हिंदू बांधव या दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीतील बांधवांनी भगवा पोषाख परिधान केल्याने तसेच भगव्या झेंड्यांनी शहर परिसर भगवेमय झाला होता. छोट्या मुलांनी अनेक वेशभूषा साकारल्या होत्या. ‘लाना होगा, लाना होगा, हिंदू राष्ट्र लाना होगा’, आदी घोषणांनी परिसर दणाणून निघाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58230 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top