
पिकुळेत रस्त्याच्या कामाला प्रारंभ
21829
पिकुळे ः येथील रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करताना आमदार दीपक केसरकर.
पिकुळेत रस्त्याच्या कामाला प्रारंभ
साटेली भेडशी, ता. १४ ः पिकुळेतील रस्ताप्रश्नी माजी वित्त व नियोजन मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर पिकुळे तिठा ते देऊळवाडी रस्त्याचे काम सुरू झाले. आमदार केसरकर यांनी शुक्रवारी श्रीफळ वाढवून कामाचा प्रारंभ केला. त्यांच्या प्रयत्नानेच रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला होता.
आमदार केसरकरांच्या शिफारशीनुसार राज्य सरकारच्या आर्थिक अंदाजपत्रकात पिकुळे तिठा ते देऊळवाडी रस्त्यासाठी निधी दिला होता. त्या रस्त्याचे काम कोरोना काळात संबंधित ठेकेदाराने केले नाही. तसेच गेले वर्षभर त्याने उर्वरित काम करण्यास दिरंगाई केल्याने त्याला बदलून दुसऱ्या ठेकेदाराला ते काम द्यावे, अशी सूचना केसरकरांनी कार्यकारी अभियंत्यांना केली. त्यानुसार पहिल्या ठेकेदाराला बदलून नवीन ठेकेदाराला काम दिले. त्या उर्वरित कामाचा प्रारंभ शुक्रवारी झाला. यावेळी तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, उपजिल्हा संघटक संजय गवस, कोनाळ विभाग प्रमुख संतोष मोर्ये, तिलकांचन गवस, संदीप गवस, उपविभाग प्रमुख व माजी सरपंच अनंत शेटकर, सरपंच दीशा महालकर, विनय गवस, ज्ञानेश्वर गवस, वसंत गवस, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप गवस उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58243 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..