जैन सभा शताब्दी अधिवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जैन सभा शताब्दी अधिवेश
जैन सभा शताब्दी अधिवेश

जैन सभा शताब्दी अधिवेश

sakal_logo
By

२४२६७, 24279

जैन सभा शताब्दी अधिवेशनाचे शानदान उद्‍घाटन

आज मुख्य सोहळा; बसवराज बोम्मई, अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. १४ ः नवी आशा आणि नवी दिशा घेऊन वाटचाल करण्यासाठी सज्ज असलेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या यंदाच्या शताब्दी अधिवेशनाचा उद्‍घाटन सोहळा आज सकाळी थाटात झाला. जैन समाजाची शिखर संस्था असलेल्या सभेच्या या ऐतिहासिक सोहळ्यास नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींच्या पावन सान्निध्यात आणि सभा पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. धर्मध्वजवंदन, पदग्रहण सोहळ्यानंतर दिवसभर शाखांचे अधिवेशन पार पडले. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतून आलेल्या श्रावक-श्राविकांच्या उपस्थितीने वातावरण भारावून गेले. महिलांचा सन्मान आणि त्यांचे आत्मबळ वाढवण्याचा इरादा यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.
येथील नेमिनाथनगर कल्पद्रुम क्रीडांगणावर भव्य सभा मंडपात जैन सभेचे ऐतिहासिक अधिवेशन दोन दिवस चालणार आहे. उद्या (ता. १५) मुख्य दिवस आहे. येथील नेमिनाथनगर कल्पद्रूम क्रीडांगणावर दोन्ही राज्यांतील प्रमुख नेत्यांसह हजारो जैन बांधवांच्या उपस्थितीत समाज हिताच्या मुद्द्यावर विचारमंथन होईल. आज उद्‍घाटन आणि शाखा अधिवेशनाची धामधूम सुरू झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात विस्तार असलेल्या सभेच्या या सोहळ्यासाठी हजारो लोक सांगलीत दाखल झाले आहेत. दिवाणबहादूर अण्णासाहेब लठ्ठेनगर असे नाव देण्यात आले असून, त्याचे उद्‍घाटन डॉ. भरत लठ्ठे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते धर्म ध्वजवंदन झाले. सहकार महर्षी स्व. शामराव पाटील यड्रावकर शांतिपीठ उद्‍घाटन माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या हस्ते झाले. राज्यमंत्री तथा अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्‍घाटन झाले. श्रावकरत्न रावसाहेब पाटील यांनी अध्यक्ष म्हणून पदग्रहण केले. यावेळी चेअरमन रावसाहेब पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष माधव डोर्ले, डॉ. अजित पाटील, सहखजिनदार पा. पा. पाटील, खजिनदार संजय शोटे, अधिवेशनाचे कार्याध्यक्ष सुरेश पाटील, आमदार अभय पाटील, सचिव प्रा. एन. डी. बिरनाळे, खजिनदार सागर वडगावे आदी प्रमुख उपस्थित आहेत.
-------------------
मुख्यमंत्री आॅनलाईन संवाद साधणार
अधिवेशनाचा मुख्य सोहळा उद्या (ता. १५) होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन संवाद साधणार आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री विश्‍वजित कदम, कर्नाटकचे मंत्री शशिकला जोल्ले, उमेश कत्ती, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष ॲड. धनंजय गुंडे, खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, माजी खासदार राजू शेट्टी आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण सेवा पुरस्काराने; तर दिवंगत बापूसाहेब बोरगावे यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. विसाव्या शतकातील प्रथमाचार्य शांतिसागरजी महाराज जीवन चरित्र ‘धर्मसाम्राज्यनायक’ या मराठी व कन्नड ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. दुपारी ३ वाजता दक्षिण भारत जैन सभेचे शताब्दी अधिवेशन सुरू होईल. त्यात पुढील तीन वर्षांसाठी नूतन समिती गठीत केली जाईल. काही महत्त्वाचे ठराव संमत केले जातील. रावसाहेब आ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होणार आहे.
०००००००००००००००

विधवांचा सन्मान राखायलाच हवा
शताब्दी अधिवेशनाच्या उद्‍घाटनानंतर जैन महिला परिषदेचे ३४ वे अधिवेशन झाले. स्वागताध्यक्ष आमदार श्रीमती गीता जैन यांनी स्वागत केले. परिषद चेअरमन स्वरूपात यड्रावकर यांनी प्रास्ताविक केले. मेधा ताडपत्रीकर प्रमुख पाहुण्या होत्या. विधवा महिलांना सन्मानाने वागणूक देऊ, महिलांना उद्यमी बनवू, आरोग्य संवर्धनासाठी काम करू, अन्न आणि पाणी वाचवू, असे ठराव केले. यासाठी जैन महिला परिषद पुढाकार घेईल, अशी घोषणा करण्यात आली.
---------------
शेतकरी वधू-वर मेळावा घेऊ
शेतकरी नवरा नको, हा विचार अतिशय घातक आहे. तो बदलला पाहिजे. त्यासाठी वीर महिला मंडळाने पुढाकार घ्यावा आणि शेतकरी वधू-वर मेळावा भरवावा, असा ठराव आज मध्यवर्ती समितीच्या अधिवेशनात करण्यात आला. हे समितीचे आठवे अधिवेशन होते. चेअरमन विजया पाटील अध्यक्षस्थानी होत्या. स्वागताध्यक्ष सुजाता शहा यांनी स्वागत केले. सई क्रिएशनचे रेखा पाटील प्रमुख पाहुण्या होत्या.

०००००००००००००

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58248 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top