सावंतवाडी मोती तलावातून ३२१ डंपर गाळ उपसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी मोती तलावातून ३२१ डंपर गाळ उपसा
सावंतवाडी मोती तलावातून ३२१ डंपर गाळ उपसा

सावंतवाडी मोती तलावातून ३२१ डंपर गाळ उपसा

sakal_logo
By

21836
सावंतवाडी ः मोती तलावातील गाळ उपशाची थांबविलेली मोहीम.


सावंतवाडी मोती तलावातून
३२१ डंपर गाळ उपसा

आठ दिवसांच्या मोहिमेला पूर्णविराम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः येथील मोती तलावात सुरू असलेली गाळ उपसा मोहीम आज अखेर आठ दिवसांनंतर थांबविण्यात आली. यात तब्बल ३२१ डंपर गाळ उपसा करण्यात आला. या मोहिमेत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे पालिका प्रशासनाने आभार मानले.
येथील मोती तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने तलावाच्या सौंदर्याला धोका निर्माण झाला होता. तर येथील उद्यानासमोर मोठ्या प्रमाणात गाळ साचून त्यावर पानझडी निर्माण झाली होती. याबाबत अनेकदा नागरिकांनी लक्ष वेधून गाळ काढण्याची मागणी केली होती. पालिकेत झालेल्या सर्व पक्षीयांच्या बैठकीनंतर सहमताने लोकसहभागातून गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या मोहिमेला ६ मेपासून सुरुवात केली होती. गेले आठ दिवस ही मोहीम युद्धपातळीवर सुरू होती. यात तब्बल ३२१ डंपर गाळ उपसा करण्यात आला. आठ दिवसांच्या मोहिमेत आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून डोजर, तर माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावले, बांधकाम व्यावसायिक नीरज देसाई, माजी नगरसेवक उदय नाईक आदींनी आवश्यक सहकार्य दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58249 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top