कुडाळात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
कुडाळात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

कुडाळात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

sakal_logo
By

21845
कुडाळ : पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याकडे फिर्याद दाखल करताना अमित सामंत. सोबत सुनील भोगटे, काका कुडाळकर आदी.

कुडाळात राष्ट्रवादी आक्रमक

पोलिस ठाण्यावर धडक; शरद पवारांवरील टीकेचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः मराठी अभिनेत्री केतकी चितळे यांनी काव्यरचनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत येथील पोलिस ठाण्यावर धडक दिली. यावेळी अध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली चितळे यांच्या वक्तव्याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार कुडाळ पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी गुन्हा दाखल केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सामंत यांच्यासह प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, उत्तम सरापदार, नजीर शेख, सा. बा. पाटकर, संग्राम सावंत, प्रशांत पाताडे, प्रतिक सावंत, सर्वेश पावसकर आदी राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष सामंत म्हणाले, ‘‘पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केतकी चितळे या विकृत महिलेने कवितेतून उद्गार काढून जे काही मतप्रदर्शन केले, त्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचाच तिचा हेतू होता. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण व्हावी आणि समाजात अशांतता पसरावी, या विकृत हेतूने अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन ती कविता केली होती. ही प्रवृत्ती वेळीच थांबविणे गरजेचे आहे. या एकाच हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अध्यक्ष म्हणून आज येथे चितळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. कुडाळ पोलिस ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. लवकरच सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस त्यांना अटक करून येथे घेऊन येतील, असा विश्वास वाटतो.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58261 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top