
रेल्वे गाड्यांना जादा बोगी
रेल्वेगाड्यांना
जादा बोगी
कणकवली ः मे महिन्याची सुटी आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकणमार्गावर धावणाऱ्या विशेष गाड्यांना जादा बोगी जोडण्यात आल्या आहेत. रेल्वेमार्गावरील गांधीधाम-तिरुनवेली या गाडीला १६ मे रोजी; तसेच तिरुनवेली ते गांधीधाम या गाडीला १९ मे रोजी जादा बोगी जोडण्यात येणार आहेत. भावनगर ते कोचिवली; तसेच कोचिवली ते भावनगर या गाडीलाही जादा बोगी जोडण्यात आल्या आहेत. सूरत ते करमळी, तसेच मेंगलोर ते उधान या गाडीलाही दोन स्लीपर बोगी जोडल्या आहेत.
---
फोंडाघाट येथे
उष्णता वाढली
फोंडाघाट ः येथील परिसरात कमालीची उष्णता वाढली आहे. त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अवकाळी पावसाबरोबर तापमानात वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. परिसरात सध्या विवाह सोहळे आणि धार्मिक कार्यक्रम होत असून पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
----------
कनेडी-कणकवली
रस्त्याची दुरवस्था
कनेडी ः कणकवली ते कनेडी या मार्गावरील अभियांत्रिकी महाविद्यालय ते डेगवेकर बाग परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबरी भाग खराब झाल्याने वाहने चालवणे धोकादायक बनले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58317 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..