
टॅलेंट सर्च परीक्षेत बांदा केंद्रशाळेचे यश
टॅलेंट सर्च परीक्षेत बांदा केंद्रशाळेचे यश
बांदाः राज्यस्तरीय ब्रेन डेव्हलपमेंट व सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत बांदा नं. 1 केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. पहिलीतून समर्थ पाटील याने सुवर्ण, सिध्दी प्रभूशिरोडकरने रौप्य, तर आयुष पवार, रुही येडवे, विहान गवस व नाजुका खान यांनी कांस्य पदक मिळविले. दुसरीतून दुर्वा नाटेकरने सुवर्ण, तर काव्या चव्हाण हिने कांस्य पदक मिळविले. संदेश सावंत युवा प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत चौथीमधून श्रद्धा आकेरकर व युवराज नाईक यांनी कांस्य, तर सहावीमधून अमोघ वालावलकर याने कांस्य पदक मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, वर्गशिक्षका शुभेच्छा सावंत, रंगनाथ परब, वंदना शितोळे, रसिका मालवणकर, शीतल गवस, जागृती धुरी, लुईजा गोन्सालवीस, उर्मिला मोर्ये, रंगनाथ परब, सरोज नाईक, जे. डी. पाटील, प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश मोरजकर, सरपंच अक्रम खान व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58349 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..