
भालावलच्या विकासासाठी महिनाभरात निधीः संजू परब
swt151.jpg
21891
भालावलः येथील सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करताना संजू व इतर मान्यवर.
भालावलच्या विकासासाठी महिनाभरात निधी
संजू परब यांचे आश्वासन; सातेरी देवीचा वाढदिवस सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. १५ः भालावल गावाने केलेला हा सन्मान कायम स्मरणात राहणारा आहे. गावाच्या विकासासाठी येत्या महिनाभरात दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन सावंतवाडी पालिकेचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद ऊर्फ संजू परब यांनी भालावलवासीयांना दिले.
भालावल गावची देवता सातेरी देवीचा वाढदिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात झाला. यावेळी श्री. परब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी तलाठी नेत्रा सावंत यांचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमास उपस्थित पंचायत समिती माजी उपसभापती विनायक दळवी यांनीही कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. भालावलवासीयांच्या सहकार्यासाठी कायम तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच अश्विनी परब यांनी आपले विचार मांडताना सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे काम करणे सोप जाते. त्यामुळे विकासकामांना वाव मिळत असल्याचे सांगून सहकार्याबद्दल आभार मानले.
तलाठी नेत्रा सावंत यांनी सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त करत या सत्काराने आपली जबाबदारी वाढली आहे. ती पुढेही समर्थपणे पेलण्याचे सामर्थ्य देवी सातेरी आपणास देवो, अशी प्रार्थना करत आभार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर देवस्थान कमिटी अध्यक्ष अशोक परब, सचिव वामन परब, भालावल उपसरपंच समीर परब, दीपिका परब, काजू व्यापारी भाऊ वळंजू, विनायक परब, यशवंत देसाई, भरत परब, सोनू दळवी आदींसह देवस्थान कमिटी सदस्य तसेच मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अनेक मान्यवरांचा देवस्थानच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये सरपंच अश्विनी परब, दीपिका परब, अशोक परब, काजू व्यापारी श्री. वळंजू, तलाठी सावंत, जिल्हा परिषद शिक्षिका कोठावळे, आरोग्य सेवक गवस, कोनशी पोलिस पाटील सौ. कोनसकर, मानकरी परब, दीपक गावकर आदींसह भालावल पंचक्रोशीतील प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानित केले. तांबोळी सरपंच अभिलाष देसाई, आबा देसाई, सूर्याजी देसाई (डेगवे), बाळकृष्ण दळवी, बाबू दळवी (विलवडे), भिकाजी घाडीगावकर, शशिकांत गवस (दाभील) यांनाही गौरविण्यात आले. सत्कारमूर्तींनी आपले विचार मांडले व कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विलवडे हायस्कूलचे हेवाळकर सर यांनी, तर आभार उदय परब यांनी मानले. या कार्यक्रमासाठी देवस्थान कमिटीचे मोठे योगदान लाभले. मुंबईतील कलाकारांचा ''मराठी पाऊल पडते पुढे'' हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही लाभला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58350 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..