
पंचम खेमराज महाविद्यालयास माजी विद्यार्थ्यांतर्फे साऊंड सिस्टिम
swt१५३.jpg
२१८९३
सावंतवाडीः शुभदादेवी भोसले यांच्याकडे साऊंड सिस्टिम सुपूर्द करताना माजी विद्यार्थी. सोबत युवराज लखमराजे भोसले आदी.
पंचम खेमराज महाविद्यालयास
माजी विद्यार्थ्यांतर्फे साऊंड सिस्टिम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ः येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाला माजी विद्यार्थ्यांकडून ९५ हजार रुपये किंमतीची साऊंड सिस्टिम भेट देण्यात आली. बीएससी १९८२ च्या बॅचचे स्नेहसंमेलन पार पडले. यावेळी हा निर्णय घेत विद्यार्थ्यांनी साऊंड सिस्टिम भेट दिली.
यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्ष श्रीमंत सौ. शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोसले, संस्था सदस्य जयप्रकाश सावंत, महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, डॉ. हिरामणी, प्रा. शिंत्रे, प्रा. शिरोडकर, प्रा. पाटील, डॉ. देठे, प्रा. डी. एन. पाटील, डॉ, ठाकुर, प्रा. दिलीप गोडकर, प्रदीप पेडणेकर, हेमंत झांट्ये, चंद्रशेखर नाडकर्णी, अरुण देसाई, अॅड. गावकर, बाळकृष्ण राणे आदी उपस्थित होते. शुभदादेवी भोसले यांनी अशा प्रकारच्या साऊंड सिस्टिमची महाविद्यालयाला गरज होती, असे सांगून ती दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. युवराज लखमराजे यांनीही माजी विद्यार्थ्यांच्या या दातृत्वाबद्दल आभार मानले. यावेळी माजी विद्यार्थी लिओ अल्मेडा, शिरिष केळुस्कर, हेमंत झांट्ये, प्रदीप पेडणेकर, दिलीप गोडकर, सुधीर सावंत, आनंद बाक्रे, मंगल प्रभू, सुरेखा शेट्टी, विनोद गवस, श्रीकृष्ण प्रभू, विजया आंबिये, प्रमोद मयेकर, अरुण धरणे, सुधीर शिरोडकर, नंदकुमार देसाई, बाळकृष्ण राणे, मेघा पावसकर, प्रभू पणशीकर, मंगल सौदागर, साबाजी तेरसे, मुरलीधर भाटकर, विद्या जडये, आर. एस. केरकर, एस. एस. धुरी यांचे आर्थिक सहकार्य लाभले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58355 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..