
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे फुल्ल
गणेशोत्सवासाठी रेल्वे हाऊसफुल्ल
जादा गाड्यांच्या घोषणेची प्रतीक्षा; ३१ ऑगस्टला गणपती येणार
चिपळूण, ता. १४ः कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे कोकणात येऊ न शकलेल्या चाकरमान्यांनी आतापासूनच गणेशोत्सवात गावी येण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांची तिकिटे फुल्ल झाली आहेत. रेल्वेचे तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना आता जादा एक्स्प्रेस गाड्यांची प्रतीक्षा आहे.
यावर्षी उच्चांकी संख्येने चाकरमानी रत्नागिरीत येण्याची शक्यता आहे. यावर्षी ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे २७ ऑगस्टपासूनच चाकरमान्यांनी कोकणात येणाऱ्या सर्व गाड्यांची तिकिटे फुल्ल झाली आहेत. यात २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या दरम्यानच्या गाड्यांमध्ये वातानुकूलित टू आणि थ्री टियरच्या जागाही संपल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही क्लाससाठी वेटिंग लिस्ट शिल्लक नसून तिकीट बुक करण्याचा पर्यायच शिल्लक नसल्याचे चित्र आयआरसीटीच्या संकेतस्थळावर दिसत आहे. मुंबईतून रत्नागिरीत येणाऱ्या प्रवाशांची कोकण कन्या, मांडवी, जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा या रोज धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य राहिले आहे. यानिमित्त सुटणाऱ्या जादा गाड्यांपेक्षा वेळेत पोचतात. त्यामुळे गणेशोत्सवात गावी येण्यासाठी चाकरमान्यांनी आधीच तिकिटे बुक केली आहेत. काही मिनिटात गाड्या फुल्ल झाल्यानंतरही काही चाकरमानी आयआरसीटीचे संकेतस्थळ चेक करतात. कुणी आपले तिकीट रद्द केले आहे का, आपल्याला वेटिंगचे तिकीट तरी मिळेल का, मिळाले तर ते निश्चित होईल का याची चौकशी करताना दिसत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58381 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..