रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

-rat15p15.jpg
21938
- सायली दामले
------------
सायली दामले यांचे
अध्यात्म मंदिरात होणार कीर्तन
रत्नागिरी : श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस) आणि रत्नागिरीतील अध्यात्म मंदिर, अखिल भारतीय कीर्तनकुल आयोजित कीर्तन मालिकेत स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविषयी सायली मुळ्ये- दामले कीर्तने करणार आहे. येत्या २१ व २२ मे रोजी सायंकाळी ५.३० ते ७.१५ या वेळेत वरच्या आळीतील अध्यात्म मंदिरात कीर्तन होणार आहेत. गर्जा जयजयकार क्रांतीचा या नावाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ऑक्टोबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत दरमहा कीर्तने सादर होत आहेत. यात सायली दामले हिचे कीर्तन आयोजित केले आहे. यामध्ये ती चंपावती व मैनावती आख्यान विषय रंगवणार आहे. सायली मुळ्ये या संगीत विशारद, कीर्तन विशारद आहेत. फडकेशास्त्री तसेच कीर्तनाकरिता नाना जोशी, कर्वे बुवा, महेशबुवा काणे, किरण जोशी, विशाखा भिडे आणि गायनाकरिता संध्या सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
------------------
-rat15p14.jpg
21937
- रत्नागिरी : शिरगाव येथील स्वगृही सेवा संस्थेत मोफत आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. अनिरुद्ध लेले यांचे स्वागत करताना किरण जोशी.
-------------
मोफत आरोग्य तपासणी शिबिर
रत्नागिरी : शिरगांव गणेशवाडी येथे स्वगृही सेवा संस्थेमार्फत शिरीषालय वृद्धसंकुलात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. अनिरुद्ध लेले व त्यांच्या टीमने निवासी ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, विश्वस्त व ग्रामस्थांची तपासणी केली. निरोगी आरोग्यविषयक सल्ला दिला. सोबतच औषधे दिली. या शिबिरामध्ये सर्वांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. या शिबिराचा फायदा कर्मचाऱ्यांना व ग्रामस्थांना चांगल्या प्रकारे झाला. या शिबिराचा ३५ जणांनी लाभ घेतला. डॉ. लेले व त्यांची टीम उपस्थीत राहून सेवा दिल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा वीणा लेले यांनी सर्वांचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58404 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top