पाट येथील सावंत कुटुंबीयांना नीलेश राणे यांच्याकडून मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाट येथील सावंत कुटुंबीयांना नीलेश राणे यांच्याकडून मदत
पाट येथील सावंत कुटुंबीयांना नीलेश राणे यांच्याकडून मदत

पाट येथील सावंत कुटुंबीयांना नीलेश राणे यांच्याकडून मदत

sakal_logo
By

21985
पाट ः सावंत कुटुंबीयांची भेट घेऊन चर्चा करताना माजी खासदार नीलेश राणे.

पाट येथील सावंत कुटुंबीयांना
नीलेश राणे यांच्याकडून मदत
कुडाळ ः पाट-परबवाडा (ता. कुडाळ) येथील घराला अचानक आग लागल्याने प्रकाश सावंत यांचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे. आज माजी खासदार भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी कुटुंबांची भेट घेतली व त्यांना आर्थिक मदत केली. तसेच लवकरच शासकीय मदत मिळून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी युवा नेते आनंद शिरवलकर, समाधान परब, राजा पडते आदी उपस्थित होते.
---
लावणी गौरव पुरस्कार सोहळा लवकरच
धारावी : लावणी कलावंत महासंघाचा आठवा वर्धापनदिन आणि लावणी गौरव पुरस्कार सोहळा बुधवारी (ता. १ जून) दामोदर हॉल, परळ या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर रसिक, तसेच कलाकार उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी ज्या कलाकारांनी कोविड काळात उल्लेखनीय कार्य केले अशांना ‘देवदूत सन्मान’ आणि ज्यांनी कोविड काळात महासंघाला सहकार्य केले अशा मान्यवरांना ‘दानशूर सन्मान’ प्रदान करण्यात आला होता. तसेच ‘मी आणि माझी कला’ ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील विजेत्यांचा सन्मान करणार आहेत. शाहीर सुखदेव कांबळे, बतावणीवीर काशिनाथ गवळी, नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे, लावण्यवती मोहिनी पटेल, पार्श्वगायिका सुषमा मोरे, नेपथ्यकार व निर्माता प्रकाश कुलकर्णी, पुरुष लावणी कलावंत अनिल हंकारे, प्रकाशयोजनाकार उपेश साटम असल्याचे लावणी कलावंत महासंघाचे अध्यक्ष संतोष लिंबोरे पाटील यांनी कळवले आहे.

वर्सोवा महोत्सव २२ मेपर्यंत
मुंबई ः वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्यातर्फे वर्सोवा, जोगेश्वरी पश्चिम येथील सिटी इंटरनॅशनल शाळेजवळील म्हाडा मैदानामध्ये वर्सोवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ मे २०२२ पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्‍घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळेस देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विशेष अतिथी म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व आमदार प्रवीण दरेकर, आमदार आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, माजी मंत्री व आमदार आशीष शेलार आणि प्रसिद्ध संगीतकार अनू मलिक उपस्थित होते. या वेळेस आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. वर्सोवा गौरव पुरस्कार सोहळ्याचेही आयोजन केले होते.

युवा धोरण चर्चासत्रासाठी आवाहन
धारावी : यशवंतराव चव्हाण सेंटर महाराष्ट्रात गेल्या तीन दशकांहून जास्त वेळ आजतागायत विविध क्षेत्रांत अविरत कार्यरत आहे. या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. आता राष्ट्रीय युवा धोरण २०२१ च्या मसुद्याबाबत चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय युवा धोरण २०२१ चा मसुदा जारी करून हितधारकांच्या शिफारशी, दृष्टिकोन आणि मते मागविली आहेत. या धोरणाद्वारे तरुणाईची क्षमता विकसित करण्यासाठी १० वर्षांचा आराखडा सादर केला आहे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर युवा विभागाद्वारे राज्यभरात सहा चर्चासत्रे/ कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. ज्यामध्ये विविध सामाजिक संस्था, सामाजिक महाविद्यालये, युवा संघटना, मंडळे यांना मते मांडण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

रस्त्यावरील झाकणाची दुर्दशा
मुलुंड ः मुलुंड पश्चिमेतील बीपीएस क्रॉस रोड क्रमांक दोनवरील गटाराचे झाकण तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. हा रस्ता प्रमुख रस्त्यांमध्ये गणला जातो. या रस्त्यावरून हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र गटाराचे झाकण तुटलेले असल्यामुळे येथील वाहनचालकांना आणि नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर प्रशासनातर्फे बांबूची चौकट ठेवण्यात आली आहे. हा तात्पुरता उपाय असून या ठिकाणी कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत.

मुलुंडच्या गोशाळा रस्त्यावर कचरा
मुलुंड ः कचऱ्याचे डबे उपलब्ध नसल्याने पश्चिमेतील गोशाळा रोडवर गेल्या एक आठवड्यापासून कचरा टाकला जात आहे. परिणामी येथे दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्यावरील कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित प्रशासनाने येथील समस्येची गंभीर दखल घ्यावी आणि रस्ता साफ करून मोकळा करावा, अशी मागणी या भागातील रहिवासी करत आहेत.

ट्रेलरखाली सापडल्याने मृत्यू
नवीन पनवेल : भरधाव वेगाने जात असलेल्या चालकाचा ताबा सुटून ट्रेलर उलटला. त्याखाली एक पादचारी सापडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना पनवेलजवळील पळस्पे फाटा येथे घडली. ट्रेलर पलटी होत असताना पादचारी श्रीमंत हसनअप्पा कांबळे (वय ६०) हे त्याखाली सापडले. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58436 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top