अंगणवाडी सेविका तीन महिन्यापासून वेतन विना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी सेविका तीन महिन्यापासून वेतन विना
अंगणवाडी सेविका तीन महिन्यापासून वेतन विना

अंगणवाडी सेविका तीन महिन्यापासून वेतन विना

sakal_logo
By

अंगणवाडी सेविका तीन महिन्यापासून वेतनाविना
चिपळूण, १५ : ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण देणे आणि आरोग्यविषयक माहिती गोळा करण्याची जबाबदारी असलेल्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहे. वेतन वाटप पद्धतीत झालेल्या बदलाचा फटका अंगणवाडी सेविकांना सहन करावा लागत आहे.
महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा आयुक्तालयामार्फत ‘पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम’ (पीएफएमएस) द्वारे अंगणवाडी सेविकांना वेतन दिले जात होते. ही यंत्रणा केंद्र सरकारच्या योजनांसाठी होती. त्याचा वापर करण्याची राज्य सरकारला मुभा होती. परंतु आता या पद्धतीत बदल करण्यात आला. अंगणवाडी सेविकांना वेतन देण्याचे अधिकार आता सचिवालय स्तरावर प्रदान केले आहेत. ही पद्धत मार्चपासून लागू केली. मात्र, नवी यंत्रणा अद्याप सुरळीत सुरू न झाल्यामुळे वेतनास विलंब होत आहे. परिणामी अंगणवाडी सेविकांना मार्च, एप्रिल आणि मे मधील वेतन मिळाले नाही. चिपळूण तालुक्यातील प्रकल्प १ मध्ये २२६ तर प्रकल्प २ मध्ये १८५ अंगणवाडी सेविका आहेत.
दुसरीकडे महाराष्ट्र बँकेतून वेतन मिळणाऱ्या अंगणवाडी सेविकांना वेगळ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तांत्रिक बिघाडामुळे वेतनाची रक्कम परत जात आहे. काहींना वेतन मिळत नाही तर काहींच्या खात्यात जादा रक्कम येत असल्याची तक्रार आहे.

कोट
अंगणवाडी सेविकांना मार्च आणि एप्रिलचे वेतन मिळाले नाही. वरिष्ठ पातळीवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे. साधारणत: १८ मेपर्यंत वेतन होणे अपेक्षित आहे. अनुदान प्राप्त झाले आहे, ती रक्कम शासन स्तरावरून संबंधित अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा केली जाईल.
- शिवानी शिंदे, प्रकल्प अधिकारी, चिपळूण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58457 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top