
संभाजी महाराजांचे विचार जोपासा
L22002
बांदा ः शिवतेज सेवा संस्था आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसोबत उपस्थित मान्यवर.
संभाजी महाराजांचे विचार जोपासा
शामराव काळे ः बांदा केंद्रशाळेत जयंती उत्साहात साजरी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ ः छत्रपती संभाजी महाराज हे शूर योद्धा तर होतेच; परंतु ते उत्कृष्ट शासक व अभ्यासूही होते. त्यांनी आपल्या अल्प कारकिर्दीत स्वराज्याचा दहापटीने विस्तार केला. त्यांची स्वराज्यनिष्ठा, धर्मनिष्ठा आताच्या पिढीने आत्मसात करून त्यांच्या विचारांची जपणूक करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बांदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शामराव काळे यांनी येथे केले.
येथील शिवतेज सेवा संस्थेच्यावतीने जिल्हा परिषद केंद्रशाळेत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री. काळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साहित्यिक प्रकाश तेंडोलकर, चंद्रकांत सावंत, सूर्यकांत सांगेलकर, नट वाचनालयाचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, सचिव राकेश केसरकर, जयेश म्हाडगूत आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आयोजित शालेय व खुल्या गटात घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी श्री. तेंडोलकर म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज आताच्या पिढीला समजणे खूप गरजेचे आहे. वक्तृव स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. महाराजांचे विचार घराघरात पोहचविण्याचा शिवतेज संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद आहे. यावेळी चंद्रकांत सावंत, सूर्यकांत सांगेलकर, शुभेच्छा सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूषण सावंत यांनी, सूत्रसंचालन रीना मोरजकर यांनी केले. यावेळी संस्थेचे नीलेश मोरजकर, अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, प्रथमेश राणे, केदार कणबर्गी, नारायण बांदेकर, संतोष मंझिलकर, लक्ष्मण कळंगुटकर, दीक्षा गवस, तृप्ती गवस आदी उपस्थित होते.
.................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58462 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..