दर्शन घडले हिंदू-मुस्लिम ऐक्याचे, प्रतीक ठरले शांततेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दर्शन घडले हिंदू-मुस्लिम ऐक्याचे, प्रतीक ठरले शांततेचे
दर्शन घडले हिंदू-मुस्लिम ऐक्याचे, प्रतीक ठरले शांततेचे

दर्शन घडले हिंदू-मुस्लिम ऐक्याचे, प्रतीक ठरले शांततेचे

sakal_logo
By

भोंग्याचा विषयः लोगो
....
दर्शन घडले हिंदू-मुस्लिम ऐक्याचे, प्रतीक ठरले शांततेचे

चिपळूणचा आदर्श घेण्यासारखा; सर्वधर्मियांचे सहकार्य, शांतता कमिटीमध्ये समन्वयाने निर्णय
चिपळूण, ता. १५ : राज्यात भोंगे आणि हनुमान चालीसावरून वातावरण ढवळून निघाले असताना चिपळूणमध्ये सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सर्वधर्मीय मंडळींनी शांतता राखून सहकार्य केले. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल, असे किंचितही वातावरण निर्माण झालेले नाही. यातून हा तालुका ऐक्याचे, शांततेचे प्रतीक ठरला आहे.
चार में नंतर मशिदीवरील भोंगे न काढल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा म्हणतील, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर पोलिसांनी सर्वधर्मीय लोकांना शांततेचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यांमध्ये शांतता कमिटीची बैठक झाली. त्यानंतर मशिदीवरील भोंगे यांचा आवाज कमी करण्यासाठी चिपळूण मुस्लिम समाज या संस्थेने पुढाकार घेतला.
तालुक्यात काही ठिकाणी मंदिरे विशेष हनुमान मंदिर आणि मशिदीमधील अंतर कमी आहे. अशा ठिकाणी हनुमान चालीसा पठण होईल, अशी शक्यता होती. मात्र, समाजात तेढ निर्माण होईल, असे कृत्य करणार नाही, असे स्वखुषीने हिंदू बांधवांकडून सांगण्यात आले. राजकीय पक्ष आंदोलनात सहभागी होतील, अशी शक्यता होती. तसेही झाले नाही. मनसेकडून शहरातील एका हनुमान मंदिरात आरती करण्यात आली. तीही शांततेत झाली. त्यामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी प्रसिद्ध असलेला चिपळूण तालुका भोंग्याच्या विषयावरही शांत राहिला.
---------
कोट
चिपळूण तालुक्यातील हिंदू आणि मुस्लिम बांधव अनेक वर्षापासून एकत्र राहत आले आहेत. हिंदूंच्या सणांमध्ये मुस्लिम सहभागी होतात आणि मुसलमानांच्या सणांमध्ये हिंदू लोक सहभागी होतात. हा या तालुक्याचा इतिहास आहे. मशिदीवरील भोंगे राजकारण सुरू झाल्यानंतर आम्ही भोंग्यांचा कोणाला त्रास होणार नाही. याची काळजी घेतली. मशिदीवर भोंगे लावण्यासाठी सरकारकडून परवानगी घेतली.
- नाजिम अफवारे, कार्याध्यक्ष, चिपळूण मुस्लिम समाज
..
चौकट
एकूण ५७ मशिदी
चिपळूण तालुक्‍यात एकूण ५७ मशिदी असून त्याठिकाणी नेहमी आजान होते. त्यासाठी शासनाकडून परवानगी घेण्यात आली. अजान देताना डेसिबलची मर्यादा राखली जाईल. याची काळजी चिपळूण मुस्लिम समाजाने घेतली. गोवळकोट येथील मरकजमध्ये तालुक्यातील ५७ मशिदींच्या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याबाबत नियोजन केले. तालुक्यातील मशिदीमध्ये पूर्वीप्रमाणेच आजान होते. मात्र, पहाटेची आजान भोंग्यामध्ये होत नाही. अजाण देताना डेसिबलची मर्यादाही राखली जाते. दिवसा होणाऱ्या अजानचा आवाज कमी केला आहे. तालुक्यातील मुस्लिम समाजाने सहकार्याचे धोरण स्वीकारल्यानंतर सर्वधर्मीयांनी त्याचे स्वागत केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58468 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top