होय, आम्ही पोहायला शिकलो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होय, आम्ही पोहायला शिकलो
होय, आम्ही पोहायला शिकलो

होय, आम्ही पोहायला शिकलो

sakal_logo
By

-rat15p26.jpg
L22010
- चिपळूण ः वाशिष्ठी नदीत पोहण्याचे प्रशिक्षण घेताना शिबिरार्थी.
-------
‘होय, आम्ही पोहायला शिकलो’

आपत्तीच्या मुकाबल्यासाठी प्रशिक्षण; ३७ जणांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ : ‘आम्ही पोहायला कसे शिकायचे, आम्हाला पोहता येईल का, एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकाकडून आम्हाला प्रशिक्षण मिळेल का,’ असे असंख्य प्रश्न मनात घेऊन आलेल्या चिपळुणातील नागरिकांना जलतरणातील कौशल्य कसे असते, याची प्रचिती आली. चिपळूण पालिकेकडून पालिका कर्मचारी; तसेच नागरिकांसाठी तीनदिवसीय चित्तथरारक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये नागरिकांसह पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
आपत्ती काळात बचावकार्यातून भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. शुक्रवारपासून शहरातील गांधारेश्वर मंदिर येथील वाशिष्ठी नदी परिसरात या प्रशिक्षणाला सुरवात झाली. यामध्ये रेस्क्यूचे विविध धडे देण्यात आले. गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात चिपळूण शहरासह परिसरात महापूर आणि अतिवृष्टीने हाहाकार उडवला होता. या वेळी तशी दुर्दैवी वेळ पुन्हा चिपळूणवासीयांवर ओढावू नये, यासाठी पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पुणे येथील अस्तित्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत आपत्ती व्यवस्थापनांतर्गत तीन दिवस सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणापूर्वी पात्रता निवड चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत ३७ जलतरणपटूंची निवड केली होती. या वेळी अस्तित्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे संचालक भूषण देशपांडे यांनी नागरिक व पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांची निवड झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58473 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top