दाभोळ-दापोली पोलिस ठाण्याचे कामकाज सुरळित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-दापोली पोलिस ठाण्याचे कामकाज सुरळित
दाभोळ-दापोली पोलिस ठाण्याचे कामकाज सुरळित

दाभोळ-दापोली पोलिस ठाण्याचे कामकाज सुरळित

sakal_logo
By

दापोली पोलिस ठाण्याचे कामकाज सुरळीत

आगीत मोठे नुकसान; तक्रारी नोंदविण्याचे काम सुरू
दाभोळ, ता. १५ ः दापोली येथील पोलिस ठाण्याच्या इमारतीला शनिवारी (ता. १४) सकाळी साडेसहा वाजता लागलेल्या आगीत पोलिस ठाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची नोंद अकस्मात जळीत म्हणून केली आहे.
पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या शहीद शशांक शिंदे सभागृहातून पोलिस ठाण्याचे कामकाज सुरू केले असून शनिवार रात्रीपासून सीसीटीएनएस यंत्रणा सुरू केल्याने जनतेच्या तक्रारी नोंदविण्याचे काम सुरू झाले आहे. पोलिस निरीक्षक यांच्या दफ्तरी कक्षामध्ये असलेल्या भिंतीवरील वीज मीटरजवळ शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत पोलिस ठाण्यातील कागदपत्रे, संगणक, प्रिंटर, टेबल, खुर्च्या आदी साहित्य जळून गेले आहे. या घटनेची खबर सहाय्यक पोलिस निरीक्षक धोंडू मोरे यांनी दिली असून अधिक तपास पोलिस निरक्षक विवेक अहिरे करत आहेत.
...
चौकट
वैयक्तिक लॅपटॉप व प्रिंटरही खराब
पोलिस ठाण्यात लागलेल्या आगीमुळे पोलिस ठाण्यातील तक्रार नोंदविण्यासाठी असलेली संगणकीय सुविधा सीसीटीएनएस यंत्रणा बंद पडली होती. त्यामुळे दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात या जळीत घटनेची खबर नोंदवून ही घटना पुन्हा दापोली पोलिस ठाण्यात शून्य नंबरने तपासासाठी पाठविली आहे. आगीतून पोलिस कर्मचारी यांचे वैयक्तिक लॅपटॉप व प्रिंटरही वाचले नाहीत. आगीतून घाईने सामान व कागदपत्रे बाहेर काढताना ते नादुरुस्त झाले असल्याने कर्मचारी यांनाही आता आर्थिक भूर्दंड बसला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58509 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top