रत्नागिरी-जलपुर्नभरणा चवळवळ कौतुकास्पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-जलपुर्नभरणा चवळवळ कौतुकास्पद
रत्नागिरी-जलपुर्नभरणा चवळवळ कौतुकास्पद

रत्नागिरी-जलपुर्नभरणा चवळवळ कौतुकास्पद

sakal_logo
By

जलपुर्नभरणा चवळवळ कौतुकास्पदः निकम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः कोकणात भरपूर पाऊस पडत असला तरी जमिनितील पाण्याची पातळी दिवसें-दिवस घटत आहे. उन्हाळ्याच्या दिवसातमध्ये कोकणात तीव्र पाणी टंचाई निर्माण होत आहे. याला मुख्य कारण म्हणजे जमिनीतील पाण्याची घटत चालेली पातळी होय. अशा वेळी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जलपुर्नभरणाची उभी केलेली चळवळ कौतुकास्पद व भविष्याचा वेध घेणारी आहे, असे मत जलपुर्नभरण कार्यक्रमाच्यावेळी आमदार शेखर निकम यांनी मत व्यक्त केले.
डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने तुरळ डिकेवाडी येथील राधाकृष्ण मंदिर येथे बोअरवेलमध्ये जलपुर्नभरणाची प्रक्रिया करण्यात आली. यावेळी जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, रमेश डिके, जानू डिके, दत्तात्रय गोगटे आदी उपस्थित होते. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने जलपुर्नरभरणा विषयी प्रबोधन करण्यात आले. जमिनीतील पाण्याची कमी झालेली पातळी याचा कोणी विचार करत नाही. यासाठी प्रतिष्ठानच्यावतीने जलपुर्नभरण अभियाना सारखी मोहिम हाती घेण्यात आली. गेली काही वर्षे हा उपक्रम सुरू असून त्यास चांगले यश आले आहे. तुरळ-डिकेवाडीच्या ग्रामस्थांनी जलपुर्नभरणाच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल प्रतिष्ठानचे आभार मानले. यावेळी १८० श्री सदस्य ग्रामस्थांनी भाग घेतला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58622 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top