
अन नदीत बुडाल्याच्या घटनेने उडाली धावपळ!
-rat16p2.jpg-
22129
राजापूर ः मॉक ड्रिलमध्ये सहभागी अधिकारी, कर्मचारी.
-----------------
अन नदीत बुडाल्याच्या घटनेने उडाली धावपळ!
पोलिसांसह पालिकेची यंत्रणा घटनास्थळी; आपत्तीचे मॉकड्रील यशस्वी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ः शहरातील अर्जुना नदीपात्रात काहीजण बुडत असल्याचा फोन राजापूर, नाटे पोलिस ठाण्यासह नगर पालिकेत खणाणला आणि सर्वांची एकच धावपळ उडाली. पोलिसांसह नगर पालिका प्रशासन बचाव पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पाण्यात बुडणाऱ्या लोकांना वाचविण्यासाठी ‘मॉक ड्रील’ असल्याचे समजल्यावर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.
पावसाळी हंगामात उदभवणाऱ्या आपत्तीच्या काळात बचाव कार्यासाठी विविध शासकीय कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केले जातात. आपत्तीच्या काळात तत्काळ मदतकार्य करता यावे, याकरीता चोवीस तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष सजग असतो. दरवर्षी पावसाळ्यामुळे आपत्ती काळात प्रशासन किती सतर्क आहे, याची चाचपणी करण्यासाठी ‘मॉक ड्रील’ घेण्यात येते. त्यानुसार, शहरातील मापारी मोहल्ला येथील अर्जुना नदीपात्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पाण्यात बुडणाऱ्या लोकांना वाचविण्याची मॉक ड्रिल घेण्यात आले. या वेळी पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर, नाटेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आबासो पाटील यांच्यासह राजापूर, नाटेचे पोलिस अधिकारी, कर्मचारी व पालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
..
चौकट
सागर रक्षक दल सदस्यही..
राजापूर पोलिस ठाणे, नाटे सागरी पोलिस ठाणे, पोलिस अधिकारी व अंमलदार, नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे मॉक ड्रील घेण्यात आले. अर्जुना नदीपात्रात काहीजण बुडत असल्याची माहिती मिळताच राजापूर व नाटे पोलिसांसह नगर पालिका प्रशासन तसेच शोध व बचाव पथक सदस्य, सागर रक्षक दल सदस्य यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, मॉक ड्रिल असल्याचे समजताच साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आपत्ती काळात कशा प्रकारे बचाव कार्य राबविले जाते, याची सविस्तर माहिती देण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58625 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..