राजापूर-ओणी-अणुस्कुरा रस्ता कामाचा अखेर शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-ओणी-अणुस्कुरा रस्ता कामाचा अखेर शुभारंभ
राजापूर-ओणी-अणुस्कुरा रस्ता कामाचा अखेर शुभारंभ

राजापूर-ओणी-अणुस्कुरा रस्ता कामाचा अखेर शुभारंभ

sakal_logo
By

at16p14.jpg
L22156
- राजापूर ः अणुस्कुरा येथे रस्त्याच्या डांबरीकरणाचे सुरू झालेले काम.
--------------
ओणी-अणुस्कुरा रस्तेकामाला प्रारंभ

वाहनचालकांनी टाकला निःश्वास; निविदाप्रक्रियेचा तिढा सुटला
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ ः सुमारे साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजुरीनंतर ठेकेदारांचा वाद आणि तांत्रिक मुद्द्यामध्ये अडकलेल्या तालुक्यातील ओणी-पाचल-अणुस्कुरा रस्त्याच्या रखडलेल्या कामाच्या प्रारंभाला अखेर मुहूर्त सापडला आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सोमवारपासून (ता. १६) सुरवात झाली. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे आव्हान ठेकेदार आणि बांधकाम विभागापुढे राहणार आहे.
गतवर्षीच्या अतिवृष्टीच्या काळात घाटमाथा परिसराकडे जाण्यासाठी जिल्हाभरातून तालुक्यातील ओणी-पाचल-अणुस्कुरा हा एकमेव मार्ग मोकळा होता. त्यामुळे जिल्हाभरातील अवजड वाहतूक या मार्गाने सुरू होती. सातत्याने सुरू असलेल्या या वाहतुकीमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली. त्यामुळे या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी काम करावे, अशी मागणी वाहनचालकांसह सर्वसामान्य प्रवाशांकडून केली जात आहे. त्यासाठी पाचलवासीयांकडून पाचल ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने नुकतेच धरणे आंदोलनही छेडण्यात आले होते. पाचल ग्रामविकास मंडळानेही प्रशासनाला निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले होते. या रस्त्याच्या कामासाठी सुमारे साडेसात कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र, तांत्रिक वादामध्ये निविदाप्रक्रिया रखडली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58651 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top