वेंगुर्लेत शिवसंपर्क अभियान नियोजन बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत शिवसंपर्क अभियान नियोजन बैठक
वेंगुर्लेत शिवसंपर्क अभियान नियोजन बैठक

वेंगुर्लेत शिवसंपर्क अभियान नियोजन बैठक

sakal_logo
By

L२२१९९

- वेंगुर्ले ः शिवसंपर्क अभियान नियोजन बैठकीत जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी मार्गदर्शन केले. सोबत यशवंत परब, बाळा दळवी, सचिन वालावलकर, सुनिल डुबळे.

वेंगुर्लेत शिवसंपर्क अभियान नियोजन बैठक
जिल्हाप्रमुख पडतेंची उपस्थिती ः आगामी निवडणुकांबाबत चर्चा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १६ ः तालुका शिवसेनेची मासिक बैठक व शिवसंपर्क अभियान नियोजन बैठक जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या अध्यक्षतेखाली साई मंगल कार्यालय येथे झाली. यावेळी आगामी होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागनिहाय बांधणी व मागील झालेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा आढावा घेण्यात आला. २६ ते २९ मे या कालावधीत होणाऱ्या ‘शिवसंपर्क अभियान'' यशस्वी करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाप्रमुख पडते यांच्यामार्फत आपल्यास्तरावर मार्गदर्शन व सूचना करण्यात आल्या.
या सभेला शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सुनिल डुबळे, माजी नगरसेवक तुषार सापळे, युवासेनेचे पंकज शिरसाट, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, वायंगणी सरपंच सुमन कामत, दाभोली सरपंच उदय गोवेकर, प्रकाश गडेकर, अण्णा वराडकर, संजय परब, सुधाकर राणे, शंकर कुडव, सुनिल सातजी, अमित गावडे, रश्मी डिचोलकर, अनन्या धावडे, सुरेश भोसले, संदिप केळजी, सुनिल वालावलकर, रवि पेडणेकर, शैलेश परुळेकर, कोमल सरमळकर, दिलीप राणे, प्रतिभा खानोलकर आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात २६ ते २९ मे या कालावधीत शिवसंफ अभियान राबविण्यात येणार आहे. शिवसंपर्क अभियानामध्ये ठाकरे सरकारने घेतलेले व महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या शासनाच्या योजना व सिंधुरत्न योजना यांची सविस्तर व विस्तृत माहिती पुढील कालावधीत शिवसैनिकांना देण्यात येणार आहे. या योजनेच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काही सूचना मांडल्या. पक्षवाढीसाठी या योजनेची परिपूर्ण माहिती देऊन जनतेपर्यंत पोहोचविण्यास शिवसेनेकडे दिल्यास त्याचा फायदा पुढील कालावधीत शेतकरी, बागायतदार, मच्छिमार, महिला बचतगट आदींना होईल अशा सूचना काही पदाधिकाऱ्यांकडून मांडण्यात आल्या. यावर जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी या योजनांसंदर्भात सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष दिपक केसरकर यांच्याशी चर्चा करून कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58690 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top