संगमेश्वर-डंपरची मोटारीला धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर-डंपरची मोटारीला धडक
संगमेश्वर-डंपरची मोटारीला धडक

संगमेश्वर-डंपरची मोटारीला धडक

sakal_logo
By

बावनदी येथे डंपरची मोटारीला धडक;
पळणाऱ्या चालकाला ग्रामस्थांनी पकडले
संगमेश्वर, ता. १६ ः मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदी येथे डंपरने मोटारीला धडक दिल्याने अपघात झाला. सोमवारी (ता. १६) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास झालेल्या या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या डंपरने बावनदी येथे मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या मोटारीला ड्रायव्हर बाजूने फरफटत नेले. या धडकेत कारच्या उजव्या बाजूचा टायर फुटून गाडीचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने मोटारीतील कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, अपघात केल्यानंतर डंपर चालकाने डंपर सुसाट पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, देवरुखच्या दिशेला जाणाऱ्या कॉर्नरवर त्याला ग्रामस्थांनी अडवले. या घटनेची खबर पोलिसांना देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58810 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top